लोकनेते साखर कारखान्याकडून 'मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल भेट योजना'

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मोहोळ (सोलापूर) : लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत (बाळराजे) पाटील यांनी कारखान्यास 2014 पासून सलग तीन वर्ष ऊस घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल भेट योजना अभिनव योजना सुरू केली आहे.

मोहोळ (सोलापूर) : लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत (बाळराजे) पाटील यांनी कारखान्यास 2014 पासून सलग तीन वर्ष ऊस घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल भेट योजना अभिनव योजना सुरू केली आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये ऊस उत्पादक व सभासदांच्या  विश्‍वासाचे मोठे योगदान आहे. हेच विश्वासाचे नाते पुढे चालू रहावे सभासदांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे यासाठी "मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल योजना" सुरू करण्यात आल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन तथा जि.प सदस्य विक्रांत (बाळराजे) पाटील यांनी केली. 

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, लोकनेते कारखान्यास सलग तीन वर्षे ऊस देणार्‍या ऊस उत्पादकांच्या मुलींच्या व मुलांच्या लग्नकार्यासाठी अनुक्रमे पंधरा व दहा हजार रुपये भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत. ही योजना "मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल भेट योजना" या नावाने योजना सुरु करण्यात आली आहे. लोकनेते कारखान्याच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीमध्ये दरवर्षी ऊस देणार्‍या सुजाण ऊस उत्पादकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपत अनगर करावर विश्वास ठेवत कारखान्याच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमीका बजावलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही ऊतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार राजन पाटील यांनी आजवर ऊस उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगिण हिताचेच निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही योजना सुरु केली आहे असे विक्रांत पाटील म्हणाले.

ज्या ऊस उत्पादकांनी आपल्या लोकनेते कारखान्यास 2014-15 या गळीत हंगामा पासून सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस दिला आहे. त्यांना या योजने अंतर्गत ही शुभमंगल भेट प्रदान करण्यात येणार आहे. ऊस उत्पादकांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी ज्या ऊस उत्पादकांचा ऊस सलग तीन वर्षे आला आहे त्यांनी विवाहापुर्वी पंधरा दिवस अगोदर स्वतःचे आधारकार्ड झेरॉक्स ऊस बीलाच्या तीन वर्षाच्या पावत्याची झेरॉक्स मुलगा व मुलीच्या विवाहाची लग्न आमंत्रण पत्रिका व इतर कागदपत्रांसह कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी विकांत पाटील यांनी केले. 

यावेळी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, लक्ष्मण मुखेकर, गोरख पवार,  के. डी. वैद्य, देवदत्त भोसले, सुरेश चव्हाण, एम.आय. देशमुख, एम.व्ही.चट, रावसाहेब आवताडे, राजशेखर गायकवाड, संजय खुडे, बाळासाहेब पेठे, मोहन चव्हाण, गणपत गवळी, अनंत उरणे, सोमनाथ म्हेत्रे, संदिप गुंड इत्यादी उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news western maharashtra news solapur sugar factory