पेट्रोल पंपावर दुचाकीने अचानक पेट घतल्याने गोंधळ

संदिप कदम
शुक्रवार, 2 मार्च 2018

फलटण(जि.सातारा) -  येथील एसटीस्टँड समोरील पेट्रोल पंपावर एका दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडाला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीवर त्वरित अग्निशमन यंत्राने फवारणी केल्यामुळे आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला. 

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर दुचाकी वाहन पटल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. 

शहरातील एसटीस्टँड समोर असणाऱ्या दोशी पेट्रोलपंपावर काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक सीडी 100 हिरोहोंडा दुचाकी पेट्रोल भरण्यास आली होती, त्यामध्ये पेट्रोल भरत असताना, अचानक गाडीने पेट घेतला व आगीचा भडका उडाला. पेट्रोल पंप कर्मचारी औदुंबर व त्यांच्या सहकार्यानी त्वरित पंपावर असलेल्या अग्निशमन यंत्राद्वारे आग विजवली व पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला.

Web Title: marathi news western maharashtra news two wheeler