महिला मतदारांचा वाढला टक्का! 

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 6 मार्च 2018

सातारा - लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात महिला मतदारांच्या संख्येत सुमारे दहा हजारांनी वाढ झाली आहे. 

सातारा - लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात महिला मतदारांच्या संख्येत सुमारे दहा हजारांनी वाढ झाली आहे. 

सन 2014 च्या मतदार यादीनुसार महिला मतदारांची संख्या 11 लाख 48 हजार 288 इतकी होती. सद्यस्थितीत 11 लाख 57 हजार 982 इतकी नोंद आहे. जिल्ह्यात अद्यापही पुरुष मतदारांच्या तुलनेने महिला मतदारांची संख्या 948 ने कमी दिसते. त्यामुळे युवती व महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. जिल्हा निवडणूक शाखेद्वारे तीन ऑक्‍टोबर ते 15 डिसेंबर 2017 या कालावधीत मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानंतर दहा जानेवारीला अंतिम केलेली मतदार याद्यी प्रसिद्ध करण्यात आली. महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्यक्ष महिला मतदारांची तफावत असल्याने महिला मतदार नोंदणीमध्ये अडचणी दूर करून त्यावर उपाययोजना करण्यासारखे प्रयत्न जिल्हास्तरावर उपक्रम राबविण्यात आले. आता जागतिक महिला दिनी (ता. आठ मार्च) महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. 

महिला मतदार नोंदणीचे गुणोत्तर (एक जानेवारीनुसार) 
मतदारसंघ - पुरुष - महिला - अन्य - एकूण - गुणोत्तर 
फलटण- 162182 - 149691 - 00 - 311873 - 923 
वाई- 160656 - 156112 - 00 - 316768 - 972 
कोरेगाव- 146063 - 136549 - 00 - 282612 - 935 
माण- 166030 - 155188 - 00 - 321218 - 935 
कऱ्हाड उत्तर- 141202 - 132614 - 01 - 273817 - 939 
कऱ्हाड दक्षिण- 141144 - 130163 - 00 - 271307 - 922 
पाटण- 144446 - 140980 - 01 - 285427 - 976 
सातारा- 159456 - 156685 - 09 - 316150 - 983 

एकूण लोकसंख्या - 3400082 (पुरुष - 1724378, महिला - 16575704). 
एकूण मतदार - 2379172 (पुरुष - 1221179, महिला - 1157982 - अन्य - 11) 

Web Title: marathi news women voter satara