यिन निवडणूक, कोल्हापूर : यहाँ के हम सिंकदर !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

चुरशीने झालेल्या मतदानाने मतदानाची उत्सुकता ताणली होती. कोण विजयी होणार,याची महाविद्यालयाच्या कॅंम्पसमध्ये जोरदार चर्चा होती. आज निकालाचा दिवस असल्याने उमेदवारांचे समर्थक सकाळीच "सकाळ' शहर कार्यालयाच्या परिसरात थांबून होते. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर प्रत्येक जण कोण आघाडीवर आहे, याचा अंदाज घेण्यात दंग होते.

कोल्हापूर : यिन प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत स्मिता पोतदार (सायबर महिला महाविद्यालय), सुकन्या शेलार (सायबर), आरती बनसोडे (आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय), प्रिती महापुरे (महावीर महाविद्यालय) व आशिष पाटील (शहाजी छत्रपती महाविद्यालय) विजयी झाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे निवडणूक झाली. 

चुरशीने झालेल्या मतदानाने मतदानाची उत्सुकता ताणली होती. कोण विजयी होणार,याची महाविद्यालयाच्या कॅंम्पसमध्ये जोरदार चर्चा होती. आज निकालाचा दिवस असल्याने उमेदवारांचे समर्थक सकाळीच "सकाळ' शहर कार्यालयाच्या परिसरात थांबून होते. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर प्रत्येक जण कोण आघाडीवर आहे, याचा अंदाज घेण्यात दंग होते. मित्र-मैत्रिणींशी मोबाईलवरून संपर्क साधत माहिती देत होते. सायबर महिला महाविद्यालयातील उमेदवार स्मिता पोतदार ही 273 मते मिळवून विजयी झाली.शिवानी पाटील हिला 127 मते मिळाली. आठ मते अवैध ठरली. सायबरच्या समाजकार्य विभागातून सुकन्या शेलार व आशा शिंदे या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. सुकन्याला 53, तर आशाला 39 मते मिळाली. महावीर महाविद्यालयातील प्रिती पाटीलने 141, तर सोनाली ने 133 मते मिळवली. 

शहाजी छत्रपती महाविद्यालयातील निकालाकडे मतदारांचे लक्ष लागून होते. येथील मतदान केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने मतदान झाल्याने विजयाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार,याची उत्कंठा होती.या निवडणुकीत आशिष पाटीलला 258 मते मिळाली. संजय पाटीलला 167, तर योगेश कुरणेला एक मत मिळाले. इचलकरंजीतील आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील आरती नलवडेने तब्बल 417, तर विभावरी नकातेने 82 मते मिळवली. इतक्‍या विक्रमी मताने विजयी झाल्यानंतर आरतीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यिन समन्वयक सूरज चव्हाण याने संयोजन केले. रोहन शारबिद्रे, सुनील रणदिवे, अभिजित खाबडे, सायली पाटील, श्‍वेता देवळेकर, सिद्धार्थ साळोखे यांनी सहकार्य केले. 

गुलालाची उधळण 
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. उमेदवारांना त्यांनी खांद्यावर उचलून त्याच्या विजयाच्या घोषणा दिल्या. गुलालाची उधळण करत ते महाविद्यालयांच्या दिशेने रवाना झाले. 

चौगले,वडर,शिंगे बिनविरोध 
न्यू कॉलेजमधून सौरभ चौगले (बी. ए. भाग-तीन), इचलकरंजीतील डीकेटीईमधील आदित्य वडर (टेक्‍स्टाईल टेक्‍नॉलॉजी, भाग-तीन), गिरीश शिंगे (टेक्‍स्टाईल इंजिनियरींग, भाग-तीन) यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यांचेही निकालानंतर कौतुक करण्यात आले. या उमेदवारांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्‍न मांडण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी : 

  • स्मिता पोतदार (सायबर, फूड टेक्‍नॉलॉजी भाग- दोन) - 273 
  • सुकन्या शेलार (सायबर महिला महाविद्यालय, एमएसडब्ल्यू भाग - एक) - 53
  • आरती बनसोडे (आक्काताई रामगोंडा पाटील, बी. ए. भाग-तीन) - 417 
  • प्रिती महापुरे (महावीर महाविद्यालय, बीएड्‌ भाग - तीन) - 141 
  • आशिष पाटील (शहाजी छत्रपती महाविद्यालय, बी.ए. भाग - एक) - 258
Web Title: Marathi News YIN 2017 Election Kolhapur Results