K-OK marathi news zp schools no facilities providing कऱ्हाडमधील जिल्हा परिषद शाळांची स्थिती गंभीर  | eSakal

कऱ्हाडमधील जिल्हा परिषद शाळांची स्थिती गंभीर 

हेमंत पवार
बुधवार, 24 जानेवारी 2018

कऱ्हाड - सरकारने ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची सोय त्यांच्या गावातच व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या १४४ जिल्हा परिषद शाळेत १ हजार १४ विद्यार्थी आठवीचे शिक्षण घेत आहेत. तेथे शिकवण्यासाठी असलेल्या शिक्षकांपैकी अनेकजण संबंधित शैक्षणिक अहर्ता असलेले नाहीत. तर जे शिक्षक शिकवत आहेत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणच देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत आवश्यक असलेल्या प्रयोगशाळांसह अन्य सुविधा प्राथमिक शाळेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कऱ्हाड - सरकारने ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची सोय त्यांच्या गावातच व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या १४४ जिल्हा परिषद शाळेत १ हजार १४ विद्यार्थी आठवीचे शिक्षण घेत आहेत. तेथे शिकवण्यासाठी असलेल्या शिक्षकांपैकी अनेकजण संबंधित शैक्षणिक अहर्ता असलेले नाहीत. तर जे शिक्षक शिकवत आहेत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणच देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत आवश्यक असलेल्या प्रयोगशाळांसह अन्य सुविधा प्राथमिक शाळेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांची व्यवस्था करण्यात आली. त्याद्वारे मुलांना आपल्या गावात शिक्षण मिळू लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक समस्या दुर होण्यास मदत झाली. मात्र तरीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न उभा आहे. ग्रामीण भागातील दुर्गम-डोंगराळ परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दूरवर चालत जावे लागते. त्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे लक्षात आल्यावर सरकारने ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची सोय त्यांच्या गावातच व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या जिल्हा परिषद शाळात आठवीपर्यंतचे वर्ग सुरु आहेत. त्याअंर्गत जिल्ह्यातील १४४ शाळांतील १ हजार १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. 

'सरकारने जिल्हा परिषद शाळांत आठवीचे वर्ग सुरु ठेवले आहेत. त्यांना प्रयोगशाळांसह अन्य भौतिक सुविधा आपण देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. असे असताना संबंधित वर्ग सुरु ठेवण्यात काय अर्थ आहे? वर्ग सुरु ठेवायचे असतील तर शिक्षण खात्याने तशा सुविधा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान तरी थांबवावे,' असे कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख यांनी मत व्यक्त केले. मात्र सहावीनंतर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेसह अन्य साधनांचा वापर करावा लागतो. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना चौथी ते पाचवीपर्यंतच शिकवण्याचा अनुभव असतो, असे सांगितले जाते. मात्र सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी संबंधित शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर प्राथमिक शाळांतून प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालये यासह अन्य सुविधा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक सुविधा आणि साहित्य नसल्याने केवळ पुस्तकी ज्ञानावरच त्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचा विचार करुन सरकाने संबंधित शाळांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

 

Web Title: marathi news zp schools no facilities providing