दिपक माने फसवणूक प्रकरणाच्या फिर्यादीस नकार

Marathi news_Mangalvedha_Rejecting the case of Deepak Mane fraud case
Marathi news_Mangalvedha_Rejecting the case of Deepak Mane fraud case

मंगळवेढा - मलेशियात चोवीस दिवसापासून अटकेत असलेल्या दिपक माने याला परत आणण्याचे प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयातून सुरु असताना या फसवणूक प्रकाराची फिर्याद दाखल करुन घेण्यास मंगळवेढयातील ठाणे अंमलदाराने नकार दिला आहे. यामुळे दिपकच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. 

मलेशियात नोकरीचे आमीष दाखवून मानेवाडीतील दिपक माने याला वर्किंग व्हिसा न देता दिड लाखाला सांगलीच्या एंजटने फसविल्याचे प्रकरण 'सकाळ'ने उजेडात आणल्यानंतर या प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेत जिल्हयातील दोन तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. कोल्हापूर जिल्हयात ऊस तोडणीस गेलेल्या मानेवाडीयील दिपकच्या आई-वडीलांचा 'सकाळ'च्या कोल्हापूर प्रतिनिधीने शोध घेऊन तुमच्या मुलाला फसविले असल्याचे सांगितले. पण चिंतेत असलेल्या माने कुटूंबियाला काय करावे हे सुचेनासे झाले. शेवटी या फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यास मंगळवेढा पोलीस स्टेशनला दिपकचे काका शंकर माने गेले. ठाणे अंमलदाराने गुन्हा तिकडे घडला असल्याने तुम्ही तिकडेच दाखल करा, असा सल्ला देवून परत पाठविले. तालुक्यातील गरीब विदयार्थ्यांवर झालेल्या फसवणूकीबाबत परराष्ट्र मंत्रालय दखल घेत असताना पोलीस स्टेशनने फिर्याद न घेतल्याने मानेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. 'या प्रकरणाबाबत मला उशिरा रिपोर्टींग झाले. फिर्यादीस बोलावून घेतले असून काय करता येईल ते बघतो', असे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. 
 
'फसवणूक प्रकरणी सायं साडेचार वाजता गेल्यावर या प्रकरणाची फिर्याद घेण्यास नकार दिल्यानंतर गावी गेलो रात्री बोलावून 11 च्या दरम्यान या प्रकरणाची तक्रार अर्ज स्विकारण्यात आला. आज सकाळी सदर एजंटाच्या वडीलांनी फोन करुन पाच ते सहा दिवसात दिपकला परत आणतो. घेतलेले सर्व पैसे परत देतो', असे सांगितले असल्याचे दिपकचे काका शंकर माने यांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com