फलटण: जिंती नाका येथे कंटेनर, टँकरची समोरासमोर धडक

संदिप कदम
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

या अपघातात टँकरमधील दूध संपुर्ण रस्त्यावर सांडले. तसेच कंटेनरचा चक्काचूर झाला असून डिझेल टाकी फुटल्याने रस्त्यावर डिझेल पसरले आहे.

फलटण (जि.सातारा) : आज सकाळी जिंती नाका येथे कंटेनर आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, जिंती नाका परिसरात फोर्स मोटर्सच्यासमोर फलटणच्या दिशेने दूध घेऊन जाणाऱ्या टँकर (एम एच ११ ए एल ५३७५) व पुण्याहून येणारा कंटेनर (एम एच ४६ बीबी १८४५) यांच्यात समोरा समोर धडक झाली. यावेळी रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्रकलादेखील टँकरने धडक दिली.

या अपघातात टँकरमधील दूध संपुर्ण रस्त्यावर सांडले. तसेच कंटेनरचा चक्काचूर झाला असून डिझेल टाकी फुटल्याने रस्त्यावर डिझेल पसरले आहे.

Web Title: Marathi Satara news accident in phaltan