होलीक्राॅस शाळेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुक मोर्चा

होलीक्राॅस शाळेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुक मोर्चा

कोल्हापूर - होलीक्रॉस शाळेवर तथाकथित शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा ख्रिश्‍चन समाजावरील हल्ला आहे, असे मानून समस्त ख्रिश्‍चन समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फिती लावून मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी शाळेवरील आणि समाजावरील होणाऱ्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. होली क्रॉस शाळेतून निघालेल्या मोर्चामध्ये ख्रिश्‍चन समाजावरील हल्ले थांबवा, द्वेषाने नव्हे प्रमाने जगूया, आम्ही अल्पसंख्याक म्हणून अत्याचार करता का, आम्ही न्याय हवा अशा आशयाचे फलक घेवून ख्रिश्‍चन समाज बांधव आणि शाळेचे आजी-माजी विद्यार्थींनी सहभाग घेतला.

निवेदनात म्हटले आहे की, होली क्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर दडपशाही खपवू घेवू नये. ख्रिश्‍चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण दिले पाहिजे. शाळेवर झालेल्या हल्ल्यामुळे शाळेतील विद्यार्थींनी आणि प्रशासन भयभीत झाले आहे. वास्तविक हा हल्ला केवळ शाळेवर नसून तो ख्रिश्‍चन समाजावरील हल्ला आहे. यापूर्वीही असे अनेक वेळा हल्ले झाले आहेत. पण, हल्लेखोर समाजकंटकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या या कृत्याला बळ मिळत आहे. होली क्रॉस शाळेमध्ये सर्व जाती-धर्मातील मुली शिक्षण घेतात. या ठिकाणी असणारे व्यवस्थापणही महिलाच सांभाळतात. त्यामुळे अशा ठिकाणी तथाकथित शिवसैनिकांकडून घडवून आणलेले हे कृत्य समाजाला काळीमा फासणारे आहे. याचाच निषेध म्हणून हा मुक मोर्चा काढले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी, देवराज बारदेस्कर, व्हिक्‍टर बोरजीस, रूझाई गोनसालव्हीस, डॅनियल धनवडे, रिटा रॅडिक्‍स, जे. पी. बारदेस्कर, एम. गोपटे उपस्थित होते. 

दरम्यान होलीक्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलमधील तोडफोडप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेल्या १४ कार्यकर्त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. एम. एच. खरादी यांनी याबाबतचे आदेश दिले. सर्वांची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली.

इमारत निधीला विरोध करत शिवसैनिकांनी होलीक्रॉस शाळेत आंदोलन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड करत महिला शिक्षकांशी असभ्य वर्तन केले होते. 

याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी किशोर घाटगे, सुनील जाधव, रणजित जाधव, रोहन अतिग्रे, तुकाराम साळोखे, राजू काझी, शैलेश साळोखे, शाम जाधव, चेतन शिंदे, प्रशांत जगदाळे, पीयूष जाधव, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, अविनाश कामते आदींना अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com