माजी मंत्र्यांच्या मुलीचा छळ! कारण.. 

माजी मंत्र्यांच्या मुलीचा छळ! कारण.. 

सोलापूर : सोने आणि कार न दिल्याने माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या मुलीचा नांदेड येथे सासरी छळ झाला आहे. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : नवर्‍याने ते परस्पर घेतला घटस्फोट!

पूजा​चे 2015 मध्ये झाले होते लग्न 
माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा दिनेश कांबळे (वय 23, रा. शिक्षक सोसायटी, दक्षिण सदर बाजार, मौलाली चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सासरा खंडेराव हैबती कांबळे (वय 60), पती दिनेश खंडेराव कांबळे (वय 28), सासू शारदा कांबळे (वय 55, सर्व रा. ममता निवास खुशालसिंग नगर, हिंगोली नाका, जि. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 17 मार्च 2015 रोजी हिंदू चालीरीती प्रमाणे पूजा हिचा दिनेश याच्यासोबत विवाह झाला होता.

हेही वाचा : एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून

पंधरा दिवस व्यवस्थित नांदविले 
लग्नानंतर पंधरा दिवस आरोपींनी पूजाला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर आरोपींनी "तुझे वडील राज्यमंत्री होते. तीन टर्म आमदार होते. आम्हाला साधी कार सुद्धा दिली नाही' असे म्हणून पूजा हिचा मानसिक छळ केला. या कारणावरून तिला टोचून बोलून उपाशी ठेवले. माहेरी फोन लावू दिले नाही. माहेरून सोने व कार याची मागणी करून जून 2019 पर्यंत शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार तुषार भोई तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com