अक्कलकोट तालुक्यात कारहुण्णवी साठी बाजार सजला

राजशेखर चौधरी
सोमवार, 25 जून 2018

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात शेतकरी आणि बैलांच्या व इतर जनावरे पूजनाचा महत्वाचा सण म्हणजे कारहुण्णवीचा सण होय. येत्या बुधवारी तालुक्यात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने आणि गावात मिरवणुकीने साजरा केला जातो. यासाठी पूर्वतयारी म्हणून आज अक्कलकोट येथे आठवडा बाजारात पूर्ण बाजारपेठ या साहित्याने सजली आहे. आकर्षक रंगीबेरंगी साहित्य विक्रीस व्यापारी ठेवले आहेत. त्याच्या खरेदीसाठी आज दिवसभर मेन रोडवर दहा ते बारा दुकाने शेतकरी वर्गाच्या खरेदीसाठीच्याने गर्दीने बाजारपेठ फुलून गेला होता.

पूर्ण तालुक्यातील शेतकरी सुकी रस्सी, गोप, रेशीम, टायर सोल, साप्ती, हणपट, ताईत, घंटी, मगडा, कमरी, कुरणी आणि हार आदी व इतर साहित्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. उद्या दिवसभर शेतकऱ्यांना यापासून विविध प्रकारचे साहित्य जनावरांना घालण्यासाठी व पुजेसाठी वेळ मिळणार आहे. बुधवारी वस्तीवरील सर्व पशुधनास अंघोळ घालणे, सर्व साहित्याने सजविणे, त्यांची नेवेद्य धरून पूजा करणे आणि सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढणे आदी विधी केले जाणार आहेत. अक्कलकोट तालुक्यात बैल पोळा ऐवजी हाच मुख्य सण याठिकाणी साजरा करण्याची परंपरा आहे.

कारहुण्णवीच्या सर्व साहीत्याचे दर हे स्थिर असून मागील वर्षी जे दर होते तेच यावर्षीही आहेत. आज सोमवारी आठवडी बाजार असल्यामुळे आणि मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
-प्रमोद पाटील 
व्यापारी अक्कलकोट

Web Title: Market is available for the carnival in Akkalkot taluka