शेतकऱ्याचा तिखट संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्यांत घर बांधावे आणि लोकांची देणी द्यायचे नियोजन होते. सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली; मात्र तो मिळत नाही. मिरचीला बाजारात सध्या पाच रुपये प्रतिकिलो दर मिळतोय. त्यामुळे आता जगावे की मरावे, असा प्रश्‍न पडला. त्यामुळे मोहोळ तालुक्‍यातील कोरवली येथील प्रकाश म्हमाणे या शेतकऱ्याने सोमवारी (ता. २४) सोलापुरातील चौकात रस्त्यावर १२५ किलो हिरवी मिरची फेकून संताप व्यक्‍त केला आहे.

पायाने अपंग असलेले म्हमाणे यांची दोन एकर शेती आहे. शेतात लावलेल्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळेल आणि डोक्‍यावरील कर्जाचा भार कमी होईल, अशी अपेक्षा ठेवून त्यांनी एक एकर क्षेत्रावर ४५ हजार रुपये खर्चून मिरचीची लागवड केली होती. बाजारात मिरची नेल्यानंतर मिरचीला प्रतिकिलो केवळ पाच रुपये दर मिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही आणि कर्जही वाढणार असल्याची जाणीव झाल्याने रस्त्यावर मिरची फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत कोणत्याही शेतमालाला चांगले दर नाहीत. सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली, परंतु अंमलबजावणी झालीच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकारने तत्काळ पाहिले नाही, तर शेतकरी उद्‌ध्वस्त होईल.
- प्रकाश बाबूराव म्हमाणे, शेतकरी 

Web Title: market rate Rs 5 per kg green chili