मोटारीवर अंडी फेकून मार्केटिंग अधिकाऱ्याचे अडीच लाख लूटले

मोटारीवर अंडी फेकून मार्केटिंग अधिकाऱ्याचे अडीच लाख लूटले

निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा दत्तात्रय पाटील( वय २८, रा. नाइंग्लज) हे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच खडकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. बुधवारी सकाळी चिक्कोडीचे पोलिस उपाध्यक्ष मिथुन कुमार, खडकलाट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. जी. सुबापुरमठ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

नाइंग्लज (ता. चिक्कोडी ) येथील सतगौडा पाटील हे एका कंपनीचे मार्केटिंगचे काम करतात. ते मार्केटिंगसाठी मोटारीने मंगळवारी सकाळी बेळगावला गेले होते. तेथील कामकाज आटोपून रात्री ते आपल्या गावाकडे हातरवाट मार्गे येत होते. त्याचवेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाहनांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी दरोडेखोर दबा धरून बसले होते. पाटील यांच्या मोटारीवर दरोडेखोरांनी अंडी फेकली. त्यामुळे काच पुसण्यासाठी पाटील यांनी मोटार रस्त्याकडेला उभी केली. त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाटील यांना काहीच समजले नाही. 

दरम्यान पाटील यांच्या मोटारीमधील एक लाख ६८ हजार रुपये असलेली बॅग, सही केलेला ३२ हजार रुपयांचा धनादेश, २५ हजार रुपयाचा लॅपटॉप आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल दरोडेखोरांनी लांबविला. 

पाळत ठेवूनच दरोडा
सतगौडा पाटील हे नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंगचे काम करतात. त्यानिमित्त आपल्या गावाहून दररोज बेळगाव येथे ये-जा करतात. त्यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल व मोठी रक्कम असल्याची माहिती घेऊन त्यांच्या येण्याजाण्यावर पाळत ठेवूनच दरोडेखोरांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com