विश्वजित कदमांच्या उपस्थितीत शेतात झालं कार्यकर्त्यांचं शुभमंगल

marrage
marrage

कडेगाव (सांगली) : लग्नाचा बार जोरदार उडवून द्यायचा, असे दोन्हीकडचे ठरले होते, पण कोरोना आडवा आला. लग्न लांबवायचे तर किती? मग ठरले, मोजक्‍या लोकांना घ्यायचे आणि लग्न उरकून टाकायचे. या मोजक्‍या पाहुण्यांत मग कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम हे आवर्जून आले आणि दहा-पंधरा लोकांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा खास ठरला


चिंचणी (ता. कडेगाव) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर व सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांचा लग्न सोहळा शेतामध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांची उपस्थिती होती .


चिंचणी येथील अजय पाटील आणि कमळापूर (ता. खानापूर) येथील भाग्यश्री गायकवाड यांचा विवाह लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसापासून लांबला होता. लग्न सोहळा धुमधडाक्‍यात करण्याची दोघांच्याही कुटुंबियांची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व युवा नेते डॉ. जितेश कदम यांचेशी अजयचे याबाबत बोलणे झाले. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गुरुवारी, 14 मे रोजी दुपारी अजयच्या चिंचणी येथील शेतामध्ये लग्न घेण्याचा विचार मांडला. त्याला दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिला. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत


विवाह करण्याची परवानगी घेण्यात आली. त्याप्रमाणे वधूकडील पाच आणि वराकडील पाच अशा एकूण केवळ दहा लोकांच्या उपस्थित शेतामध्ये विवाह संपन्न झाला.


यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम व डॉ. जितेश कदम यांनी उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले. या लग्नाला नवदाम्पत्यासहत्यांचे आई वडील व भटजी यांचेसह प्रमुख नातेवाईक उपस्थित होते. लग्न समारंभासाठी होणारा मोठा खर्चटाळून या पैशातून गावातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्‍यक वस्तूंची किट घरोघरी पोहोचकरण्यात आल्याचे वर अजय याने सांगितले. या विधायक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com