लग्नपत्रिकाही आता आईच्या नावाने...!

लग्नपत्रिकाही आता आईच्या नावाने...!

कोल्हापूर - तुलसी विवाहानंतर सर्वत्र लग्नसराई सुरू झाली असून यंदाच्या हंगामात आईच्या नावाने लग्नपत्रिका आणि पत्रिकांचे वितरण करतानाही संबंधित घरातील महिलेच्या नावे देण्याची नवी संकल्पना पुढे आली आहे. आधुनिक युगात आदिशक्तीचा गौरव करताना आम्ही ही संकल्पना पुढे आणल्याची चौकटही पत्रिकांवरून प्रसिद्ध केली जात आहे. दरम्यान, विवाहाला येताना बुके किंवा भेटवस्तूऐवजी लहान मुलांना वाचनीय अशी पुस्तके आणा, गावातील शाळेत आपण वाचनालय सुरू करणार आहोत, अशी विनंतीही पत्रिकांतून केली जात आहे. दरम्यान, सध्याच्या डिजिटल क्रांतीची झालर विवाह सोहळ्यांनाही लाभत असून ‘सेल्फी’ मूड मोबाइलवरील विविध ॲप्सचा वापर करून अधिक ‘फोटोजेनिक’ केला जातो आहे. 

फोटोग्राफीच्या व्यवसायात आता ‘पॅकेज’ ही संकल्पना रुजली असून त्यात ‘प्री वेडिंग’वर अधिक भर दिला जात आहे. ‘रोल’ असणाऱ्या कॅमेऱ्यांचा जमाना गेला आणि कॅमेरा डिजिटल झाला. फोटो कसा आला, ते कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर लगेचच दिसू लागले. फोटो पाहिजे तसा आला नाही, तर लगेचच पुन्हा नवा फोटो काढायची सोयही उपलब्ध झाली. लगेचच तो फोटो मेलही केला जाऊ लागला; पण त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मोबाइलवरच इंटरनेट आल्याने बघता बघता आता तो सोशल मीडियावरही अपलोड होऊ लागला. त्यात ‘डीपी’ला अधिक महत्त्व आले. त्यामुळे प्रत्येक वेळी नवा फोटो काढायला कोण मिळणार? यातून ‘सेल्फी’ची संकल्पना गेल्या वर्षीपासून पुढे आली आणि ती आता अगदी तळागाळापासून सेलिब्रिटींपर्यंत पोचली आहे. ‘ग्रुपी’ ही संकल्पना अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. 

विविध पॅकेजेस
‘प्री वेडिंग’ ही संकल्पना आता कोल्हापुरातही रुजली असून त्याची विविध पॅकेजेस आहेत. विवाहापूर्वी एखाद्या चांगल्या लोकेशन्सवर जाऊन वधू-वरांची छायाचित्रे विविध थीमनुसार घेतली जातात. व्हिडिओमध्ये एखाद्या गाण्यावर काही मिनिटांची क्‍लिपही तयार केली जाते. हीच क्‍लिप व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून मित्रपरिवार, नातेवाइकांना शेअरही केली जाते. त्याशिवाय विवाह सोहळ्यात प्री वेडिंग फोटोग्राफीचे स्क्रिनिंग करण्याची संकल्पनाही रुजली आहे. करिश्‍मा अल्बमसह सध्या नॉन टेरेबल अल्बमना मोठी मागणी आहे. हा अल्बम कुठेही, कसाही आणि अगदी घडी घालूनही हाताळता येतो. अर्थात त्यात सेल्फी मूडच्या फोटोंचाही आग्रह वाढला आहे. 

‘सेल्फी स्टिक’ची भुरळ
मोबाइल फोनवर स्वत:चा सेल्फी काढण्यात तोचतोपणा येतो. कारण कॅमेरा हाताच्या अंतरावर धरायचा असल्याने केवळ चेहऱ्याचाच फोटो काढता येतो. अनेकदा प्रेक्षणीय ठिकाणी गेल्यावर स्वत:बरोबरच आजूबाजूच्या गोष्टींचा आणि लोकांचाही फोटो काढण्यासाठी काठीसारखी ‘सेल्फी स्टिक’ वापरली जाते. अर्थात लग्नसराईत या ‘सेल्फी स्टिक’नेही भुरळ घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com