राईनपाडा हत्याकांडात मृत्यमुखी पडलेल्या भोसले यांच्या मुलीचा विवाह संपन्न

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - राईनपाडा हत्याकांडात मृत्यमुखी पडलेल्या भारत भोसले (तालुका खवे) यांच्या मुलीच्या विवाहाच्या खर्चाची जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद महाराष्ट्र या संघटनेने घेतली होती. त्याप्रमाणे आपली जबाबदारी पूर्ण करत याद्वारे सामाजिक कार्याबद्दल हिंन्दु मुस्लीम ऐक्याचा वेगळा आदर्श निर्माण केला.

सोशल मिडीयातील पोस्टमुळे धुळे येथे तालुक्यातील खवे येथील तीन व मानेवाडीतील एकाचे व कर्नाटकातील एकाचे हत्याकांड घडले. या मृत कुटूंबियाचे सात्वन करण्यासाठी जमियत उलमा-ए-हिंद या संघटनेचे पदाधिकारी खवे येथे आले असता अपघाताच्या वेळी पाच कुटूंबाच्या वारसाला तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजाराचे धनादेश देत बालकाच्या शिक्षणाची व विवाहाची जबाबदारी घेतली. तसेच भारत भोसले यांची कन्या पुजा हिचा विवाह खवेतील जालींदर नागन्नाथ चौगुले या युवकाबरोबर आज खवे येथे विधीवतपणे संपन्न झाला.  

मुलांचे शिक्षण खर्च देत व विवाहासाठी संसारोपयोगी साहित्य आलेल्या पै पाहुण्याचे भोजन खर्चाची जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद महाराष्ट्र या संघटनेने पार पाडली. 

यावेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, मंडळ अधिकारी नागन्नाथ वाकसे, जिल्हाध्यक्ष मौलाना इव्राहीम कासमी, युन्नुस डोणगावकर, हाफीज युसुफ अब्दुल शुकूर खलिफा, हासीब नदाफ, रफिक इनामदार, हाफीझ रियाज, हाजी सलीम बागवान, रमीझराजा मुल्ला, आयुब मुल्ला, तस्लीम आंकुजी, हाफीज सादीफ, कय्युम जमादार, हाफीज चांदा, अमीर काझी, हाफीझ आरीफ, आदम शेख, जाहीद बागवान, यासीन बागवान मच्छिद्र भोसले, भैरु भोसले, सुखदेव भोसले, मारुती भोसले आदीसह ग्रामस्थ वधुवराना शुभआशिर्वाद देण्यासाठी  उपस्थित होते..

इस्लाम मध्ये दुखात आणि सुखातही हात देण्यास महत्त्व आहे आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून मदतीचे भाग्य मिळाले. नवविवाहिताचे आयुष्य सुखाचे जावो 
- मौलाना इब्राहीम कासवी

जिथे कमी तिथे आम्ही या प्रमाणे या संघटनेचे केरळ पुरग्रस्तासाठी व राईनपाडा हत्याकांडातील मदत कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
- प्रभाकर मोरे पो.नि

समाजाला व कुटूंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अडचणीच्या काळात या संघटनेचे योगदान मोलाचे व स्मरणीय ठरले.
- मच्छिंद्र भोसले प्रदेशाध्यक्ष नाथपंथी डवरी समाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com