डॉक्‍टरच्या कुटुंबाकडून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

बार्शी - दवाखाना उभारण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, म्हणून नवविवाहितेस मारहाण व छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांत सासू, सासरे, नणंद व पती अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बार्शी - दवाखाना उभारण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, म्हणून नवविवाहितेस मारहाण व छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांत सासू, सासरे, नणंद व पती अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कृष्णा मारुती जाधव, रतन कृष्णा जाधव, अनुजा कृष्णा जाधव व अमोल कृष्णा जाधव (सर्व रा. कृष्णा नाका, रणजितनगर, कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मालती अमोल जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 14 मार्च ते 25 एप्रिल 2018 च्यादरम्यान हा प्रकार घडला आहे.

Web Title: married women Involvement from a Doctor's Family