Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी दोनशे अकरा युवकांनी केले मुंडन

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

भिगवण - सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ व परिसरातील (ता.इंदापुर) दोनशे अकरा युवकांनी मुंडन करत व आरक्षणाची टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध करत आगळ्या वेगळ्या पध्दतीने आंदोलन केले. मुंडन केलेल्या तरुणांनी नंतर रॅली काढुन शासनाचा निषेध केला.

सकल मराठा समजाच्या वताने आयोजित महाराष्ट्र बंदमध्ये भिगवण व परिसरातील गांवे शंभर टक्के सहभागी झाली होती. दुपारी बारा वाजता पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन निवेदन दिल्यानंतर तरुणांनी शासनाचा निषेध करण्यासाठी मुंडन करण्याची घोषणा केली. त्यानंतर या आंदोलनामध्येही भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, स्वामी चिंचोली व परिसरातील तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत 211  तरुणांनी मुंडन करुन घेतले. त्यानंतर मुंडन केलेल्या तरुणांनी येथील शिवरत्न मंगल कार्यालयापर्यत रॅली काढुन एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. सकाळी भव्य मोर्चा, त्यानंतर रास्ता रोको व त्यानंतर युवकांनी केलेले आगळे वेगळे मुंडन आंदोलन सुरु केले. राष्ट्रीय महामार्गावर प्रातिनिधीक मुंडनास सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत तरुण स्वतःचे मुंडन करुन शासनाचा निषेध करत होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाला शांततेचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या सहकार्याने व समाजातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा तसेच मुंडन आंदोलनही शांतते पार पडले.

Web Title: martha kranti morcha Two hundred and eleven young men shaved head