हुतात्मा चंद्रकांत गलांडे यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सातारा - हुतात्मा चंद्रकांत गलांडे अमर रहे...वीर जवान तुझे सलाम...पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आज (मंगळवार) जिल्हावासियांनी जाशी (ता.माण) येथील हुतात्मा लान्स नायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत हे माण तालुक्‍यातील 13 वे हुतात्मा आहेत. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले होते. आज ही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावकऱ्यांनी अंत्ययात्रा मार्गावर तसेच विविध चौकांमध्ये "हुतात्मा जवान चंद्रकांत अमर रहे, असे फलक लावले होते. प्रांताधिकारी दादासो कांबळे, तहसीलदार सुरेखा माने हे अंत्यसंस्कार ठिकाणी योग्य त्या सूचना करीत होते. लष्कराने मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जवान चंद्रकांत यांचे वडील शंकर, आई सुलोचना व पत्नी निशा यांनी फोडलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने जवान चंद्रकांत यांची चिमुकली मुले श्रेयस (वय चार) व जय (वय नऊ महिने) हेही कावरेबावरे झाले होते. 

Web Title: Martyr cremated Chandrakant galande