महापूजेचा मान मिळाल्याने आनंदले चव्हाण दाम्पत्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

यंदा वारकरी प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाच्या पूजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव तांडा येथील विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61) व त्यांच्या पत्नी प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला. यामुळे चव्हाण पती-पत्नीस अत्यानंद झाला.

पंढरपूर : यंदा वारकरी प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाच्या पूजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव तांडा येथील विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61) व त्यांच्या पत्नी प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला. यामुळे चव्हाण पती-पत्नीस अत्यानंद झाला.

शेतकरी असलेले हे वारकरी दांपत्य 1980 पासून 39 वर्षे सलग पंढरीच्या वारीला येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत आषाढी एकादशीच्या विठुरायाच्या महा पूजेत सहभागी होता आले याचा चव्हाण पती-पत्नीस अत्यानंद झाला. यापुढेही पंढरीची वारी अखंड चालू राहू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले की, गावाकडे पाच एकर शेती आहे. बागायत शेती होती. मात्र, दुष्काळामुळे कोणतीही पिके पिकत नाहीत. महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा, भरपूर पाऊस पडावा, हीच मागणी विठ्ठल चरणी करणार आहे. नापिकीमुळे दोन्ही मुले चालक म्हणून नोकरी करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti and Pragbai Chavhan gets honor to worship god vitthal at Pandharpur