मसाज पार्लरमध्ये वेश्‍यांचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

कोल्हापूर - गजबजलेल्या लक्ष्मीपुरीतील कपिल चेंबर्समध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या वेश्‍या अड्ड्यावर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून दोघा मुख्य सूत्रधारांना अटक केली. तसेच चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सुरू करण्याचे काम सुरू होते. अटक केलेल्या संशयितांची नावे ः जयकुमार संतोष पवार (वय ५३, रा. सुतारमळा, फुलेवाडी) आणि प्रशांत वसंतराव रहिनाक (वय ३२, रा. कराड) अशी आहेत.

कपिल चेंबर्समध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांना मिळाली. त्यांनी आज सायंकाळी तिसऱ्या मजल्यावर ‘सुखायू’ नावाने सुरू असणाऱ्या पार्लरवर छापा टाकला. येथील चार मुलींची सुटका केली. पार्लरचा मालक जयकुमार पवार व त्याचा साथीदार प्रशांत रहिनाक यांना अटक केली. 

दरम्यान, नवटक्के यांच्या पथकाने काल आपटेनगर येथील कुंटणखान्यावर छापा टाकला. हा कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच दोन परप्रांतीय महिलांची सुटकाही केली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः पूनम गणपत खंदारे (वय ३५) आणि स्वाती विनोद केसरकर (दोघे रा. साईनाथ कॉलनी, आपटेनगर) अशी आहेत. स्वाती केसरकर व पूनम खंदारे या घरातच वेश्‍या अड्डा चालवत असल्याची माहिती नवटक्के यांना मिळाली. त्यांनी छापा टाकून वेश्‍या व्यवसायासाठी आणलेल्या दोन परप्रांतीय मुलींची सुटका  केली.पूनम खंदारे हिला ताब्यात घेतले. मूख्य सूत्रधार स्वाती केसरकर गायब झाली.

डीबी पथकाची कानउघडणी
हद्दीत बिनधास्तपणे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्‍याअड्डा चालवला जातो. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील डी. बी. पथकाची प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी कानउघडणी केली.

Web Title: Massage Parlor kolhapur