कोडोलीत खुलेआम मटक्‍याचे अड्डे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील मुख्य बाजारपेठेतील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच मटक्‍याचा अड्डा राजरोसपणे सुरू आहे. गावातील बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळा, एसटी बस स्थानक व इतर परिसरातही मटक्‍यांच्या टपऱ्या जोरात सुरू असून पोलिसांचे मात्र दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात इतरत्र मटका बंद असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करत असताना कोडोलीतील या मटकाबुकीवर पोलिस मेहरबान का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

या मटक्‍याच्या जोरावर याच परिसरातील एकजण ‘सेठ’ झाला आहे. पोलिसांबरोबरच राजकीय पाठबळामुळे याच्या मटका अड्ड्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात आहे. या व्यवसायातून मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर या बुकीने गुंडही पोसले आहेत. हाच पैसा संबंधिताने पन्हाळा नगरपालिकेत एका पक्षाच्या उमेदवारामागे लावला आहे. पैशाच्या जोरावर विरोधी उमेदवारांवर दबावाचे राजकारण सुरू आहे.

आज या बुकीला भेट दिली असता काही लोक रेकॉर्ड पाहताना दिसले तर बुकीवर काम करणारे लोक खुलेआम फलक लावून लोकांकडून मटक्‍याचे पैसे वसूल करत होते. या मटका ‘सेठ’ला स्थानिक राजकारणी लोकांचे पाठबळ आहे, या जोरावर तो स्थानिक लोकांनाही जुमानत नाही. मध्यंतरी कोल्हापूर शहरातील काही अवैध व्यवसायांचा पर्दाफाश स्वयंसेवी संस्थेनेच केला होता. यावरून पोलिस ठाण्यातील डीबीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. हा प्रकार उघडकीला आला तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले होते. मात्र कोडोलीतील मटक्‍याच्या बुक्‍या मात्र बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यांच्यावर पोलिसच मेहरबान असल्यासारखी स्थिती आहे.

Web Title: mataka racket in kodoli