कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात मॅच फिक्सिंग होणे हानीकारक : मालोजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात मॅच फिक्सिंग होणे हानीकारक आहे. या पद्धतीने सामने होत असतील तर त्याला आळा घालण्यासाठी नक्कीच उपाय योजना करण्यात येतील, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज 'सकाळ'ला दिली.

ते म्हणाले, "चंद्रकांत महासंग्राम वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात नक्की काय घडले, याची मी कोल्हापूर बाहेर असल्याने कल्पना नव्हती. काल मी कोल्हापुरात दाखल झालो. स्पर्धेतील एका सामन्यात फिक्सिंग झाल्याची चर्चा माझ्या कानावर आली. केएसए फुटबॉलच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. खेळाडूंच्या खेळात गुणात्मक वाढ व्हावी, ही भूमिका आहे. मात्र, जर सामन्यात फिक्सिंग होत असेल तर ही बाब फुटबॉलसाठी घातक आहे. त्याला आळा घालण्यासाठी भविष्यात कठोर पावले उचलली जातील."

Web Title: Match fixing in the football world of Kolhapur is harmful: Maloji Raje Chhatrapati