Video : नगरमध्ये माचिसचा ट्रक पेटला... असा झाला अपघात

burnin truk in ahmednagar
burnin truk in ahmednagar

नगर तालुका : अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर आज बर्निंग ट्रकचा थरार अनुभवायला मिळाला. या घटनेमुळे बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन वाहने एकमेकांना घासल्याने हा अपघात झाला होता. त्यातील एका गाडीत काडीपेट्यांचे बॉक्स होते. या अपघातात मालमोटार काड्यापेट्यांसह भस्मसात झाली.

या बाबत समजलेली माहीती अशी की, तामीळनाडू (सातूर) येथून काडेपेट्या बॉक्‍स वाहतूक करणाऱ्या ट्रकला रवीवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अरणगाव शिवारातील चोपणवाडी येथील बाह्यवळणच्या मार्गावर हा अपघात झाला.

केडगावकडून आलेल्या वाहनाची व सोलापूर रस्त्याकडून वाळुंज बाह्यवळण रस्त्याने येणाऱ्या या काडेपेट्या वाकतूक करणाऱ्या ट्रकला घासली. त्यातून घर्षण हेऊन या ट्रकने पेट घेतला. यात ट्रकसह काडेपेट्या बॉक्‍स व साहित्य जळून भस्मसात झाले.

केडगाव बाह्यवळण रस्त्याने आलेल्या ट्रकचा या काडेपेट्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला घासल्याने गाडीतील काडेपेट्याच्या बॉक्‍सने पेट घेतला. गाडी थांबेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोलवर उतार असल्याने वाहन चालकाने गाडीला जागीच हॅंड ब्रेक लावत आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बाजूला उडी मारली. तो पर्यंत घासून गेलेला ट्रक सोलापूर रस्त्याच्या दिशेने पसार झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमन दलाच्या जावानांनी पाण्याचा मारा केला. तोपर्यंत ट्रक साहित्यासह जळुन खाक झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com