मॉरिशसच्या मंत्र्याशी ललित गांधी यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनच्या मिशन कॅन्सर कंट्रोल प्रकल्पाचे प्रमुख ललित गांधी यांनी मॉरिशस दौऱ्यात कला आणि संस्कृती मंत्री शांताराम बाबू यांची भेट घेतली. श्री. बाबू यांनी महाराष्ट्र, मॉरिशसमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान, व्यापार वृद्धिसाठी विशेष पुढाकार घेऊ, असे सांगितले. श्री. बाबु यांनी महाराष्ट्र भेटीचे आमंत्रण स्वीकारुन डिसेंबरमध्ये तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा करण्याचे मान्य केले. तसेच श्री. गांधी यांना महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग, कला आणि संस्कृती क्षेत्रातील शिष्टमंडळासह पुन्हा मॉरिशस दौऱ्यावर येण्याची विनंती केली.

कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनच्या मिशन कॅन्सर कंट्रोल प्रकल्पाचे प्रमुख ललित गांधी यांनी मॉरिशस दौऱ्यात कला आणि संस्कृती मंत्री शांताराम बाबू यांची भेट घेतली. श्री. बाबू यांनी महाराष्ट्र, मॉरिशसमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान, व्यापार वृद्धिसाठी विशेष पुढाकार घेऊ, असे सांगितले. श्री. बाबु यांनी महाराष्ट्र भेटीचे आमंत्रण स्वीकारुन डिसेंबरमध्ये तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा करण्याचे मान्य केले. तसेच श्री. गांधी यांना महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग, कला आणि संस्कृती क्षेत्रातील शिष्टमंडळासह पुन्हा मॉरिशस दौऱ्यावर येण्याची विनंती केली. या वेळी नॅशनल हेरिटेज फंडचे प्रमुख शिवाजी दौलतराव, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी देवानंद रावजी उपस्थित होते. या दौऱ्यात श्री. गांधी यांनी मॉरिशस मराठी फेडरेशन, मॉरिशस मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा समाजाने बांधलेले श्री गणेश मंदिर, छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा येथे भेट दिली.

Web Title: Mauritious minister meet with Lalit Gandhi