मायणी - शाळकरी ताईंचे तीन हजार सैनिकांना रक्षाबंधन  

संजय जगताप
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मायणी - उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस देशवासियांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहीणीच्या मायेची ऊब मिळावी. यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे तीन हजारांवर राख्या तयार करुन त्या संबंधितांना पाठवुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले. त्या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. 

मायणी - उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस देशवासियांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहीणीच्या मायेची ऊब मिळावी. यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे तीन हजारांवर राख्या तयार करुन त्या संबंधितांना पाठवुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले. त्या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. 

मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. प्रशालेतर्फे राख्या तयार करुन सीमेवरील जवान, बालसुधार गृहातील मुले व अनाथाश्रमातील मुलांनाही त्या पाठवण्यात येतात. रक्षाबंधन हा स्वतंत्र विभागच त्या शाळेमध्ये निर्माण करण्यात आला आहे. त्याच्या विभागप्रमुख ज्योती कुंभार यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने तो उपक्रम हाती घेतला. त्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींकडुन प्रशालेतच कार्यानुभव विषयांतर्गत राख्या बनवुन घेण्यात आल्या. त्यासाठी त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक साहित्य, वस्तु, साधनांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करुन देण्यात आली. राख्या तयार करण्यामुळे विद्यार्थीनींच्या अंगीभुत कलागुणांना वाव मिळाला. नवनिर्मितीची संधी प्राप्त झाली. तयार केलेल्या राख्यांमधुन आकर्षक राख्यांची वेगवेगळी पाकीटे तयार करण्यात आली. विद्यार्थीनी प्रतिनिधींमार्फत मुख्याध्यापिका वृषाली पाटील यांचेकडे ती सुपुर्द करण्यात आली. त्यानंतर ती पाकीटे प्रशालेच्या माध्यमातुन पोस्टाद्वारे नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आली. सर्वाधिक राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. साताऱ्यातील बालसुधारगृह, कराडमधील क्रांतीवीर माधवराव जाधव बालसुधारगृह, म्हसवड, विटा ( जि. सांगली ) येथील आश्रमशाळांनाही राख्या पाठवण्यात आल्या. डेहराडुन, जम्मु-काश्मीर, दिल्ली व आसाम याठिकाणच्या बालसुधारगृहे व अनाथ आश्रमांतील मुलांसाठीही राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांच्या अनोख्या भेटीने अनेकांना रक्षाबंधनाचा आनंद मिळणार आहे. बहीणीच्या प्रेमाला मुकलेल्या भाऊरायांना आपुलकी व स्नेहाची ऊबही त्या राख्यांमधुन मिळणार आहे. शाळकरी मुलींच्या त्या संवेदनशील व सामाजिक बांधीलकीच्या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, आदी मान्यवरांनी केले 

 प्रशालेचा हा आगळावेगळा उपक्रम असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत असते. राख्या पोहचल्यानंतर सैनिकांकडुन  जे संदेश येतात त्याचे खुप समाधान वाटते. - वृषाली पाटील  (मुख्याध्यापिका)

Web Title: mayni - rakshabandan to soldiers by school teachers