लई भारी ! महापौर-उपमहापौर उमेदवारी अर्जांचा "या" महापालिकेत विक्रम 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

महापालिकेतील पक्षीय बलाबल 
भाजप (49), शिवसेना (21), कॉंग्रेस (14), एमआयएम (09), राष्ट्रवादी कॉंग्रेस (04), वंचित बहुजन आघाडी (03), बसप आणि माकप (प्रत्येकी एक) असे पक्षीय बलाबल आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे एमआयएमचे पक्षीय बल पुन्हा नऊ झाले आहे. 

सोलापूर  : सोलापूर महापालिका 1964 मध्ये स्थापन झाली. तेंव्हापासून आजतागायत झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विक्रम सर्वपक्षीय उमेदवारांनी आज शनिवारी मोडला. महापौरपदासाठी चार तर उपमहापौरपदासाठी तब्बल नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी महापौरपदासाठी जास्तीत जास्त तीन आणि उपमहापौरदासाठी तीन ते चार अर्ज दाखल झाल्याची नोंद आहे. 

हेही वाचा... सोलापूर महापालिकेत मिळणार दोघींना ` या ` पदाची संधी 

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 
महापालिकेत सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र आहे. भाजप एका बाजूला तर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम यांची महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला आहेत. महाविकास आघाडीमध्ये माकप, बसप आणि वंचित बहुजन आघाडीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र हे पक्षही महाविकास आघाडीत सामील होतील असा दावा करण्यात येत आहे. 

लक्षवेधी.... अन मगरीने मारली पाण्यात उडी

महाविकास आघाडीचा निर्णय चार डिसेंबर रोजी 
महाविकास आघाडीत समावेश असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. अंतिम उमेदवार कोण असेल याचा निर्णय महापौर निवडीदिवशी (ता. चार) सकाळी 11 वाजता होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत वाद-विवाद होते, अखेर प्रदेश समितीच्या आदेशानंतर सौ. यन्नम यांचे नाव शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी जाहीर केले. यन्नम यांच्या स्पर्धक अंबिका पाटील यांना पुढील सव्वावर्षे महापौरपद देण्याचे ठरल्याचे श्री. देशमुख म्हणाले. 

हेही वाचा.... भात मळणीसाठी होतोय मोटारसायकलचा वापर

महापौरपदासाठी दाखल झालेले अर्ज  : श्रीकांचना यन्नम (भाजप), फिरदोस पटेल (कॉंग्रेस), सारीका पिसे (शिवसेना) आणि शहाजीदाबानो शेख (एमआयएम). 
उपमहापौरपदासाठी दाखल अर्ज :  नागेश वल्याळ (भाजप), राजेश काळे (भाजप), तस्लीम शेख (एमआयएम), नरसिंग कोळी (कॉंग्रेस), अमोल शिंदे (शिवसेना), किसन जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस), भारतसिंग बडुरवाले (शिवसेना), फिरदोस पटेल (कॉंग्रेस) व शहाजीदाबानो शेख (एमआयएम) 

धक्कादायक... अपक्ष संजय शिंदेंचा अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा

भाजप प्रदेश समितीच्या आदेशानुसार आम्ही महापौरपदासाठी श्रीकांचना यन्नम आणि उपमहापौरपदासाठी राजेश काळे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील इतर कुणी अर्ज दाखल केले असतील तर ते माघार घेतील आणि पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. 
- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप 

महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांना महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये अंतिम उमेदवारी कोणाची ठेवायची याचा निर्णय होईल. उमेदवारीवरून बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेऊ. 
- महेश कोठे, विरोधी पक्षनेता, महापालिका  महाराष्ट्र 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor-Deputy Mayor nomination records in this municipal corporation