महापौर, उपमहापौरांचा येत्या शुक्रवारी राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महापौर अश्‍विनी रामाणे आणि उपमहापौर शमा मुल्ला येत्या शुक्रवारी (ता. 25) सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर करणार आहेत. गेल्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतच त्या राजीनामा सादर करणार होत्या; पण सभा तहकूब झाल्याने तो लांबणीवर पडला होता.

गतवर्षी ऑक्‍टोबर 2015 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही कॉंग्रेसनी एकत्र येत महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापौरपद एक कॉंग्रेसकडे, तर एक वर्षे राष्ट्रवादीकडे अशी तडजोड आघाडी करताना झाली होती. त्यानुसार कॉंग्रेसच्या अश्‍विनी रामाणे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. रामाणे यांची वर्षाची मुदत 16 नोव्हेंबरला संपली आहे.

दरम्यान, शनिवारच्या सभेत थेट पाइपलाइनवर चर्चा होणार होती; मात्र आयुक्त पी. शिवशंकर बैठकीला उपस्थित नसल्याने ही सभा तहकूब झाली. ही तहकूब सभा आता शुक्रवारी (ता. 25) होणार आहे. या सभेमध्ये महापौरांचा राजीनामा होईल. त्यानंतर हा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर नव्या महापौरपदाच्या निवडीची तारीख जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रवादीकडून तिघी जण इच्छुक
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आता महापौरपद जाणार आहे. या पक्षाकडून हसीना बाबू फरास, माधवी प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर या तिघी इच्छुक आहेत. आमदार हसन मुश्रीफ हे कोणाला संधी देतात याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीही महापौरपदाची निवडणूक लढविणार आहे; पण कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आघाडीच्या बैठकीत होईल, असे सत्यजित कदम यांनी सांगितले.

स्थायी समितीची निवडणूक फेब्रुवारीत
महापौर निवडीपाठोपाठ स्थायी समितीच्या सभापतींचीही निवडणूक होणार आहे. 5 फेब्रुवारीला विद्यमान सभापती मुरलीधर जाधव यांची मुदत संपणार आहे. त्यानंतर हे पद कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे. स्थायी समितीत दोन्ही कॉंग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. शिवसेनेच्या एका मताला येथे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे स्थायीची निवडणूकही लक्षवेधी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mayor, dy. mayor resigned to friday