दीड ते तीन लाखांपर्यंत उमेदवारांना खर्च मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नगराध्यक्ष उमेदवारांसाठी पाच ते दहा लाख रुपये
सातारा - नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या साताऱ्यातील उमेदवारांना दहा लाख, तर कऱ्हाड व फलटणकरिता साडेसात लाख रुपये खर्च मर्यादा राहणार आहे. वाई, रहिमतपूर, म्हसवड, पाचगणी, महाबळेश्‍वर या ठिकाणच्या पालिका निवडणुकीत पाच लाख रुपये खर्च करण्यास मुभा असेल. याशिवाय याठिकाणच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांना दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.

राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे स्पष्टीकरण आज पत्रकाद्वारे दिले आहे. गेल्या निवडणुकीत तीन ते पाच वॉर्डचा प्रभाग होता. या वेळी तो दोन ते तीन वॉर्डचा झाला आला. प्रभाग पद्धत व नगराध्यक्ष निवड पद्धतीत बदल झाल्याने नगरसेवकपदाच्या उमेदवारांमध्ये निवडणूक खर्चाबाबत संभ्रम होता. याबाबत अनेकांनी राज्य आयोगाकडे चौकशी सुरू केली. संभ्रम दूर करायच्या उद्देशाने आयोगाने आज विशेष आदेश काढला आहे. प्रभागाचे क्षेत्र आणि लोकसंख्या कमी झाली असली, तरी निवडणूक आयोगाने नगरसेवकपदासाठी लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. तथापि, या वेळी थेट नगराध्यक्ष निवड होणार असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार सातारा शहरातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मुभा आहे. कऱ्हाड व फलटणला ही मर्यादा साडेसात लाखांपर्यंत, तर जिल्ह्यातील उर्वरित सर्व पालिकांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.

साताऱ्यातील नगरसेवकपदाच्या उमेदवाराला तीन लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. कऱ्हाड व फलटणमध्ये अडीच लाख, तर उर्वरित सर्व पालिका सदस्यपदाच्या उमेदवाराला दीड लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सदस्यांनाही दीड लाखापर्यंत निवडणूक खर्च करता येणार आहे.

Web Title: mayor election expenditure limit