महापौरपदासाठी उद्या निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महापालिकेच्या महापौरपदासाठी मंगळवारी (ता. 6) निवडणूक होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हसीना फरास विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या स्मिता माने, अर्चना पागर यांच्यापैकी एकीचा सामना होणार आहे. तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसचे अर्जुन माने विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीचे विजय खाडे, कमलाकर भोपळे, गीता गुरव यांच्यापैकी एकाची लढत होणार आहे. निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक 6 डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाऐवजी पुढे ढकलावी, अशी मागणी हसीना फरास यांनीही केल्याने प्रशासन या बाबतीत काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे.

महापालिकेत कॉंग्रेसचे 29, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 15, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 13, शिवसेना 4 आणि एका अपक्षाचा समावेश आहे.

महापालिकेच्या सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोघेही एकत्र आल्याने त्यांचे संख्याबळ 44 आहे. तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ 33 आहे. दोन्ही कॉंग्रेसनी सत्तेसाठी पदाच्या तडजोडी केल्या. एक वर्ष कॉंग्रेसला महापौरपद, राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळाले. आता वर्षभराने महापौरपद राष्ट्रवादीला आणि उपमहापौरपद कॉंग्रेसच्या वाट्याला येत आहे. राष्ट्रवादीकडून हसीना फरास यांचे नाव निश्‍चित झाले आहे.

यापूर्वीच्या विभागीय आयुक्तांच्या निर्णयानुसार निवडणूक 6 डिसेंबरला होणार आहे. पण हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने या दिवशी निवडणूक होऊ नये, यासाठी काही संघटनांनी पत्रे दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार हसीना फरास यांनीही तसे पत्र दिले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: mayor election in kolhapur