सोलापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

महापौर पदासाठी शोभा बनशेट्टी (भाजप) कुमुद अंकाराम (शिवसेना) प्रिया माने (कॉंग्रेस) व नुतन गायकवाड (एम आय एम) यानी अर्ज दाखल केले.

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपसह शिवसेना व एमआयएमने दोन्ही पदासाठी उमेदवारी दाखल केली. तर, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्याने उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.

महापौर पदासाठी शोभा बनशेट्टी (भाजप), कुमुद अंकाराम (शिवसेना), प्रिया माने (काँग्रेस) व नुतन गायकवाड (एमआयएम) यांनी अर्ज दाखल केले. उपमहापौर पदासाठी शशिकला बत्तुल (भाजप), अमोल शिंदे (शिवसेना), किसन जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) व अझहर शेख (एमआयएम ) यांनी अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे.

पक्षीय बलाबल :
भाजप - 49
शिवसेना - 21
कॉंग्रेस -14
एमआयएम - 09
राष्ट्रवादी - 04
बसप - 04
माकप - 01
एकुण : 102

Web Title: mayor election in solapur