सदस्य उचलाउचलीची भाषा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - विद्यमान महापौर निवडीसाठी सदस्यांच्या उचलाउचलीची भाषा सुरू झाली आहे. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी खुले आहे. दोन्ही काँग्रेसविरोधात भाजप-ताराराणी आघाडीने कंबर कसली असून, एकदा महापौर पद मिळाले की सत्ता आपल्याकडेच या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

कोल्हापूर - विद्यमान महापौर निवडीसाठी सदस्यांच्या उचलाउचलीची भाषा सुरू झाली आहे. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी खुले आहे. दोन्ही काँग्रेसविरोधात भाजप-ताराराणी आघाडीने कंबर कसली असून, एकदा महापौर पद मिळाले की सत्ता आपल्याकडेच या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

गेली अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव होते. उर्वरित अडीच वर्षे सर्वसाधारण महिलांसाठी आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या समझोत्यानुसार उर्वरित सहा महिन्यांसाठी पद काँग्रेसच्या वाट्याला येत आहे. पालकमंत्री चंदकांत पाटील, तसेच आमदार सतेज पाटील यांच्यात सध्या राजकीय फैरी झडत आहेत. स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अफजल पिरजादे आणि अजिंक्‍य चव्हाण यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे यांच्या पारड्यात मते टाकून त्यांना निवडून आणले. काँग्रेस राष्ट्रवादीकडे संख्याबळ अधिक असूनही भाजपचा उमेदवार विजयी झाला. पुढील वर्षी होणारी लोकसभा, तसेच विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराचा प्रथम नागरिक या नात्याने महापौर पदाला महत्त्व आहे. तेच आपल्याकडे खेचून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या स्थायी सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस रडारवर होते. या वेळी काँग्रेस अर्थात सतेज पाटील लक्ष्य असणार आहे. पंधरा तारखेला मुदत संपत असल्याने दहा तारखेपासूनच सदस्यांच्या उचलाउचलीचा खेळ सुरू होईल. पूर्वी राष्ट्रवादी जनसुराज्य. ताराराणी आघाडीत असाच खेळ रंगायचा. अपक्षांचे महत्त्व वाढल्यानंतर पक्षीय पातळीवर निवडणूक झाली. नेतेच प्रत्येकवेळी सोयीची भूमिका घेत असल्याने आपण घेतली, तर बिघडले कुठे या हेतूने ‘स्थायी’ निवडीवेळी सत्तांतर झाले. 

त्या वेळी देण्या-घेण्याच्या व्यवहाराचीही चर्चा अधिक झाली. महापौर निवडीवेळी कोण गळाला लागणार आणि कितीचा ‘आंबा’ पडणार याची चर्चा आहे. काँग्रेसकडे सदस्य संख्या अधिक असल्याने त्यांचे सदस्य फोडण्यावर भाजप-ताराराणी आघाडीचा अधिक भर असणार आहे. गेल्या वेळी आमदार हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. या वेळी सतेज पाटील रडावर असणार आहेत. दोन्ही काँग्रेसने एकही सदस्य फूट नये यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यास कितपत बळ मिळते, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

महापौरपदाचे संभाव्य उमेदवार
काँग्रेस-राष्ट्रवादी - उमा बनछोडे, शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, इंदूमती माने, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर 
भाजप-ताराराणी - स्मिता माने, तेजस्विनी इंगवले, रूपाराणी निकम, जयश्री जाधव, सविता भालकर, भाग्यश्री शेटगे.

Web Title: mayor selection politics congress BJP tararani aghadi