शिरवळला मयुर शिवतरेचा खून ; खंडाळ्याचे सभापतींना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

या घटनेत परस्पर विरोधी योगेश गुलाब शिवतरे व रविंद्र आनंदा मोटे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला तक्रार नाेंदविल्या आहेत.

खंडाळा ( जि. सातारा) :  सातारा-पुणे महामार्गावरील शिरवळ नजीक मोटेवस्ती (धनगरवाडी ) येथे दुरध्वनी वरुन शिवीगाळ व किरकोळ कारणावरुन दोन गटात तलवार,लोखंडी रॉड व सत्तुर ने झालेल्या तुंबळ मारहाणीत मयुर कृष्णा शिवतरे( वय 29 रा.धनगरवाडी ) यास गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मयत झाला,तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले.

या प्रकरणावरुन खंडाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती मकरंद मोटे ,मुलगा अनिकेत मोटे सह इतर चार जणांना शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुका पदाधिकारी मकरंद मोटे या प्रकरणी ताब्यात असल्याने या घटनेची चर्चा दिवसभर तालुक्यात सुरु होती. या घटनेत परस्पर विरोधी योगेश गुलाब शिवतरे व रविंद्र आनंदा मोटे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला तक्रार नाेंदविल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी सोमवारी (25 नोव्हेंबर )  दोन गटात दुरध्वनी वरुन मोठी शाब्दीक चकमक झाली.हा वाद सोमवारी राञी उशिरा पर्यंत सुरु होता.यामुळे दोनवेळा हे गट एकमेकासमोर धारादार शस्ञासह आले,दरम्यान मयुर शिवतरे आपल्या सहकारी सोबत मोटेवस्तीवर जाऊन, शिवीगाळ का केली ? असे विचारायला येथे राञी गेला असता,तुंबळ हाणामारी झाली,यामध्ये मयुर शिवतरे वर तलवारीने सपासप वार झाले.तर रवि मोटे व योगेश मोटे गंभीर जखमी झाले.मयुर शिवतरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

दरम्यान या घटनेवरुन सभापती मकरंद मोटे सह मुलगा अनिकेत मोटे व इतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घडलेल्या प्रकरणावरुन शिरवळ पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाले आहेत. अनिकेत मोटे याने त्यांच्या हातातील तलवारीने मयूर याच्या तोंडावर, गालावर, मानेवर सपासप वार केले. त्या वेळी रवी मोटे व रमेश मोटे यांनी मयुरला पाठीमागून पकडले.  फिर्यादी व मयुर यास मकरंद मोटे याने डोक्यात व मयुर च्या पाठीत लोखंडी बारणे मारहाण केली. तर केतन मोटे याने  लाथेने मारहाण केली, व मयुर शिवतरे यास अनिकेत व मकरंद मोटे यांनी केले मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तो मयत झाला आहे. असे आपल्या फिर्यादीत योगेश शिवतरे याने म्हटले आहे.
 

 पोलिसात तक्रार का दिली ? या कारणावरून, रवींद्र मोटे, मयुर रमेश मोटे,पत्नी कोमल,आई चतुरा ,भावजय अनिता, चुलती छाया यांना काठीने, तलवारीने व लोखंडी सत्तुरने मारहाण करून, वैभव शिवतरे याने लोखंडी सत्तुरने डोक्यात मारून, जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून, मयुर शिवतरे, प्रवीण शिवतरे, बेंटी कदम,योगेश शिवतरे,वैभव शिवतरे व अविनाश (पुर्ण नाव माहिती नाही) व इतर 4 ते 5 अनोळखी रा.धनगरवाडी यांच्या विरुद्ध  रविंद्र मोटे याने फिर्याद दिली आहे.

याघटनेचा पुढील तपास करीत आहे. घटनेच्या गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे ,गुन्हे अन्वेशनचे विजय कुंभार पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी भेट दिली. सातारा सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayur Shivtare Murdered In Shirval ; Chairman Of Panchayat Samiti Khandala Arrested