एस्टूट करिअर काैन्सिलिंगतर्फे एमबीबीएस प्रवेशाबाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - पुण्यातील एस्टूट करिअर काैन्सिलिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष व विख्यात इंटरनॅशनल करिअर काैन्सिलर डॉ. तुषार विनोद देवरस यांच्यातर्फे बुधवारी (ता  २२) केशवराव भोसले नाट्यगृहात मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे. 

देशात एमबीबीएस प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. यात शेवटचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. एमबीबीएस प्रवेशासाठी कोणते धोरण अवलंबावे, विदेशातील विद्यापीठांत कसा प्रवेश मिळवावा, या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. 

नीट प्रवेश परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्याची संधी आहे. या सर्व विषयांवर एस्टूट ॲकॅडमी व देवरस स्कूल ऑफ एक्‍स्लन्सतर्फे डॉ. देवरस मार्गदर्शन करणार आहेत.

एस्टूट ॲकॅडमीच्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी अमेरिका, जर्मनी, फिलिपीन्स, रशिया आणि इतर देशांमध्ये जात असले तरी भारत नेहमीच विद्यार्थ्यांसाठी पहिली पसंती ठरला आहे. अमेरिकेत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून भारतापेक्षा कमी खर्चात शिक्षण कसे पूर्ण करता येईल, जर्मनीतील मोफत एमबीबीएस शिक्षणासाठी कसा प्रवेश मिळविता येईल, फिलिपीन्समध्ये भारतापेक्षा कमी खर्चात दर्जेदार शिक्षण, रशियातील योग्य विद्यापीठांमध्येच प्रवेश का घ्यावा, याबाबत तसेच कोणती परदेशी विद्यापीठे आहेत, याची सखोल माहिती सामान्यांपर्यंत पोचावी, या उद्देशाने सेमिनारचे आयोजन केले आहे. 

डॉ. तुषार देवरस यांचा कोल्हापूर येथे यंदाचा शेवटचा सेमिनार आहे. एस्टूट ॲकॅडमीचा २५ वर्षांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये विनाडोनेशन १०० टक्के प्रवेश मिळविण्यास होईल, आणि हेच या सेमिनारचे वैशिष्ट्य आहे. सेमिनार विद्यार्थी व पालकांसाठी खुला आहे. विद्यार्थी व पालकांनी सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीतर्फे करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सूरज जमादार (भ्रमणध्वनी ः ९५५२५८१९१८) यांच्याशी संपर्क साधावा. 

डॉ. तुषार देवरस यांचा झालेला गौरव
डॉ. तुषार देवरस भाभा अणुसंधान संशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिक आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचा ‘उत्तर महाराष्ट्ररत्न पुरस्कार’ व सीएसआर जर्नल एक्‍सलंस ॲवॉर्ड २०१७’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शैक्षणिक पद्धतीत सुधारणा व शैक्षणिक कौशल्य विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल  ‘महाराष्ट्र गौरव’ प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: MBBS Admission Guidance by Astute Career Counseling