‘एमबीबीएस’साठी परराज्याची वाट सुकर - डॉ. तुषार देवरस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ‘नीट परीक्षेला कितीही गुण मिळाले तरी एमबीबीएसला देणगी (डोनेशन) न देता प्रवेश मिळू शकतो; पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी परराज्यात जाण्याची तयारी ठेवावी, परराज्यात एमबीबीएसचे शैक्षणिक शुल्कही महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे; पण केवळ माहितीच्या अभावामुळे बरचसे विद्यार्थी एमबीबीएसच्या प्रवेशापासून वंचित राहतात,’ असे प्रतिपादन एस्टूट करिअर काऊन्सलिंग ॲकॅडमीचे संचालक डॉ. तुषार देवरस यांनी केले. एस्टूट ॲकॅडमी आणि सकाळ विद्या यांच्यातर्फे एमबीबीएस प्रवेश या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हे व्याख्यान झाले. त्यात डॉ. देवरस बोलत होते. 

प्रारंभी डॉ. देवरस यांनी ॲकॅडमीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा, प्रवेश परीक्षा याची माहिती दिली.  डॉ. देवरस म्हणाले, ‘‘नीट परीक्षेला कितीही गुण मिळाले तरी एमबीबीएसला देणगी न देता प्रवेश मिळू शकतो. सरकारच्या शिक्षण शुल्क समितीने निश्‍चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम शिक्षण संस्थांना आकारता येत नाही, मात्र देणगीच्या रूपाने या संस्थाही वरील रक्कम स्वीकारतात.’’ सर्वांना चांगेल शिक्षण मिळणे, हा मूलभूत अधिकार आहे. यासाठीच आम्ही देणगीविरोधी मोहीम सुरू केली आहे. आम्हाला शिक्षण संस्थांचा विरोध आहे. जगभरातील २३ शिक्षण तज्ज्ञ एस्टूटचे संचालक आहेत. विद्यार्थ्यांना देणगी न देता चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सेवाभावी वृत्तीने काम करतो. 

नीटचे प्रश्‍न ‘सीबीएसी’वर आधारित
एमबीबीएस प्रवेशाबद्दल डॉ. देवरस म्हणाले, ‘नीट परीक्षा दिल्यानंतर एमबीबीएसला प्रवेश मिळतो. या परीक्षेला असणारे ५० टक्के प्रश्‍न हे ‘सीबीएसी’च्या ११ वी अभ्यासक्रमांवर आधारित असतो, पण आपण दुर्लक्ष करतो. आपला भर बारावीच्या अभ्यासक्रमावर असतो. क्‍लासमध्येही हेच सांगितले जाते. त्यामुळेच  तीन वर्षांपासून नेटचा सरासरी निकाल खालावला आहे. नीट परीक्षा दिल्यावर देणगी न देता प्रवेश मिळू शकतो, पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना परराज्यांचाही पर्याय दिला पाहिजे. महाराष्ट्रात एमबीबीएसचा किमान खर्च वर्षाला १२ लाख आहे, तर कर्नाटकात हाच खर्च ६ लाख येतो. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी परराज्यात जाण्याची तयारी ठेवावी. अमेरिका, जर्मनी या देशांत तर उच्च शिक्षण मोफत आहे. शिवाय शिष्यवृत्तीही आहे.’

Web Title: MBBS Donation Education Dr. Tushar Devras