प्राथमिक आरोग्य केंद्रात ओषधांची कमतरता

हुकुम मुलाणी
मंगळवार, 22 मे 2018

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात रिक्त पदाने घेरले असतानाच सध्या पुरेशा प्रमाणात औषण साठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत असल्याने गोरगरीब रुग्णाची हेळसांड होत आहे. शासकीय रुग्णालयात औषध साठा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. 
 

मंगळवेढा - तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात रिक्त पदाने घेरले असतानाच सध्या पुरेशा प्रमाणात औषण साठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत असल्याने गोरगरीब रुग्णाची हेळसांड होत आहे. शासकीय रुग्णालयात औषध साठा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. 

गेल्या काही वर्षापासून मागणीप्रमाणे आरोग्य केंद्र व उपकेंद्रात  औषध पुरवठा होत नाही. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला खासगी दुकानात औषधे घेण्यासाठी चिठठी दिली जात आहे. मोफत मिळणारी औषधे पैसे देवून विकत घ्यावी लागत आहेत. गरीब रुग्णाचा औषधाअभावी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील बोराळे, मरवडे, सलगर, भोसे, आंधळगाव या आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. सध्या तापाची गोळी देखील मिळणे कठीण झाले असून रात्री अपरात्री रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रूग्णाला औषधोपचार न केल्यास नातेवाईकाकडून उपस्थित आरोग्य कर्मचाय्राला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. पावसाळाच्या दिवसात साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. औषधाची मागणी व नोंदी ऑनलाइन होवून आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात साठा असणे आवश्यक आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर औषधसाठा कमी करण्याऐवजी मुबलक प्रमाणात दयावा. तालुक्यातून पायी जाणारे वारकरी व दिंड्या असतात. मातृत्व वंदन योजना, आनंदीबाई जोशी, आयुष्यमान भारत योजना, आयएसओ अशा योजना राबविल्या असल्याने आरोग्य खात्याची मान उंचावली असली तरी औषधे नसल्यामुळे रुग्णांच्या नाराजीसह आता आरोग्य खात्याची मान खाली जात आहे.

सन १७-१८ मध्ये सर्वाधिक प्रमाणात औषधे खरेदी करून रूग्नाला पुरविली. मंगळवेढ्यातील आरोग्य केंद्राच्या बाह्य रुग्ण विभागात सरासरी ८०-१०० रुग्ण दररोज येतात. उपलब्ध निधीतून प्राप्त औषध पुरवठा केला आहे. मात्र, पुरवठ्यापेक्षा गरज जास्त आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर, दोन वर्षापासून विभागीय पातळीवरील औषध खरेदी नसल्यामुळे 77 आरोग्य केंद्रे व 431 उपकेंद्राला नियोजन करून आशा वर्करच्या माध्यमातून औषध पुरवठा केला आता हाफकिन टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून थोड्याच दिवसात औषध पुरवठा सुरळीत होईल, असे औषध निर्माण अधिकारी प्रविण सोंळकी यांनी सांगितले आहे.

Web Title: medicines shortege in primary government hospital