#PlasticBan कऱ्हाड पालिकेची व्यापाऱ्यांशी बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

प्लास्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेने पालिकेत शहरातील व्यापाऱ्याची बैठक घेतली.

कऱ्हाड - प्लास्टीक बंदी कायद्याची कऱ्हा़ड शहरात पालिका काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे आरोग्यदायी स्वच्छता ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील प्लास्टीक पालिकेकडे जमा करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केले. 

प्लास्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेने पालिकेत शहरातील व्यापाऱ्याची बैठक घेतली. त्या बैठकीत सौ. शिंदे बोलत होत्या. उपाध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य सभापती  प्रियांका यादव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी सभापती विजय वाटेगावकर, सभापती आशा मुळे उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. शिंदे म्हणाल्या, राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या कायद्याची कऱ्हाड पालिकाही काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे ती अंमलबजावणी होण्यापूर्वी आम्ही जागृतीसाठी बैठक घेवून प्लास्टीक जमा करण्याचे आवाहन करत आहोत. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा. 

ज्येष्ठ नगरसेवक श्री. पावसकर म्हणाले शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीक व्यापाऱ्यांनी मनापासून वापरणे टाळावे. आपल्याकडे शिल्लक असलेले प्लास्टीक पालिकेकडे जमा करावे. व्यापारी व पालिका यांच्या समन्वयाने स्वच्छता व प्लास्टीक निर्मुलनाचे काम चांगल्या पद्धतीने हाती घ्यावे. यावेळी मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी प्लास्टीक बंदीच्या कायद्याची माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. आरोग्य सभापती सौ. यादव यांनी व्यापाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होवून शहर स्वच्छतेसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. माजी आरोग्य सभापती श्री. वाटेगावकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. त्यात व्यापाऱ्यांनीही सहभागी होवून नविन कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A meeting arranged Karhad Municipal with traders on plastic ban