चंद्रकांत पाटील - संग्रामसिंह देशमुख ‘गुफ्तगू’

चंद्रकांत पाटील - संग्रामसिंह देशमुख ‘गुफ्तगू’

सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष, पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या बारा सदस्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. त्यामुळे बंडखोर इच्छुकांत उत्साह संचारला आहे. या बैठकीत बदलाबाबत चर्चा झाली नाही, काही विकासकामांचे प्रस्ताव होते, त्याबाबत बोलणे झाले, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी शब्द दिल्याप्रमाणे संग्रामसिंह यांनी राजीनामा द्यावा, पदाधिकारी बदलावेत, इतरांनी संधी द्यावी, अशी मागणी बारा सदस्यांनी केली आहे. त्याला एकूण २२ सदस्यांचा  पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसे झाले नाही तर आठ दिवसांत जिल्हा परिषदेत भूकंप घडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय हालचाली होतात, याकडे अध्यक्ष, सभापती होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. अशावेळी संग्रामसिंह देशमुख यांचा आजचा मुंबई दौरा आणि त्यातही चंद्रकांत पाटील यांच्याशी बैठक, यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याबाबत श्री. देशमुख यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, ‘‘मी नेहमीच विकासकामांच्या प्रस्तावांबाबत चंद्रकांतदादांना भेटत असतो. आजही काही महत्त्वाची कामे होती. त्याबाबत त्यांची वेळ घेतली होती. त्यावरच चर्चा झाली. जिल्हा परिषदेतील अन्य घडामोडींविषयी काही विषय निघाला नाही.’’

काम करत राहा
 देशमुख म्‍हणाले, चंद्रकांतदादांनी मला मागेच ‘काम करत राहा,’ असे सांगितले आहे. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. कामावर लक्ष देऊन वाटचाल सुरू आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com