एलबीटीप्रश्‍नी उद्या व्यापक बैठक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

कोल्हापूर - लोकल बॉडी टॅक्‍स (एलबीटी) बद्दल सर्व असोसिएशनची संयुक्त बैठक येत्या सोमवारी (ता. 23) घेण्याचा निर्णय आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. सोमवारच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू असेही गांधी यांनी जाहीर केले. चेंबरच्या हॉलमध्ये बैठक झाली.

कोल्हापूर - लोकल बॉडी टॅक्‍स (एलबीटी) बद्दल सर्व असोसिएशनची संयुक्त बैठक येत्या सोमवारी (ता. 23) घेण्याचा निर्णय आज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. सोमवारच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू असेही गांधी यांनी जाहीर केले. चेंबरच्या हॉलमध्ये बैठक झाली.

शहरातील अनेक व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने एलबीटीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. व्यापाऱ्यांना आलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत. त्याबाबत व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्याला विरोध केला पाहिजे, अशी भूमिका काही व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसारच आजची बैठक झाली.

टिंबर मार्केटमधील कांतिभाई पटेल यांनी टिंबरमधून बाहेर पाठविलेल्या मालावरही एलबीटी आकारला जात आहे. त्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली. किराणा माल दुकानदार संघटनेचे संदीप वीर यांनी दुकानदारांनाही 30-35 हजार रुपये एलबीटी भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. याच्याविरोधात आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहोत. याला चेंबरने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. हार्डवेअर असोसिएशनचे ललित पटेल यांनीही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही मनमानी पद्धतीने महापालिका प्रशासनाकडून एलबीटी वसुलीबाबत तगादा लावला जात असल्याचे सांगितले. टिंबरचे लक्ष्मण पटेल यांनी महापालिकेने व्यापाऱ्यांकडून "अभय' योजनेचे अर्ज भरून घेतले आहेत. त्याचा पहिल्यांदा विचार करा, अशी मागणी केली. केसुबाई पटेल, शिवाजीराव पोवार, संजय शेटे यांनी त्यांच्या समस्या मांडला.

मार्गदर्शन करताना अजित कोठारी आणि अजित मेहता यांनी महापालिकेकडून चुकीच्या नोटिसा पाठविल्या जात असल्याचे स्पष्ट केले. त्यावर उत्तर काय द्यावे याबाबही मार्गदर्शन केले.

बैठकीत सराफ असोसिएशनचे नूतन संचालक कुलदीप गायकवाड आणि विजय हावळ यांचाही येथे सत्कार केला.

व्यापाऱ्यांना आलेल्या एलबीटीच्या नोटिसांबाबत सदनशीर मार्गाने विचार करू. यासाठी सोमवारी संयुक्त बैठक घेऊ. आयुक्तांशी काय चर्चा करायची यावर बैठकीत निर्णय घेऊ. तेथे योग्य मार्ग निघाला नाही तर 31 जानेवारीपूर्वी राज्य शासनाशी चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे.
- ललित गांधी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

Web Title: meeting for lbt issue