पाल यात्रा नियोजन बैठक संपन्न

संतोष चव्हाण 
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या. 

उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या. 

पाल यात्रा नियोजनाची बैठक झाली. त्यावेळी प्रांताधिकारी खराडे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, सहायक पोलिस निरिक्षक प्रताप भोसले, गटविकास आधिकारी आबासाहेब पवार, सरपंच जगन्नाथ पालकर, उपसरपं अंजली लवंदे, देवस्थानचे प्रमुख देवराज पाटील, यात्रा कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिभा पवार, देवस्थानचे संचालक संजयकाका काळभोर, ग्रामस्थ सचिन लवंदे, बाबासाहेब शेळके उपस्थित होते.

खराडे म्हणाले, मागील कमतरता भरून काढण्यासाठी आढावा बैठक लवकर घेत आहोत काही काम निविदा प्रक्रिया करावी लागणार आहेत. त्याला अवधी मिळावा, यात्रेच्या कामात कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. महावितरण विभागाने उर्वरित कामे पुर्ण करुन कोणतीही दुर्घटना होणार नाही त्याची खबरदारी घ्यावी. बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती करावी. आपत्कालीन रस्ताकडे विशेष लक्ष द्यावे. देवराज पाटील म्हणाले, नदीपात्रावरील रथमार्गवर पुलाचे काम निधिअभावी अपुर्ण आहे. त्यामुळे रथाच्या मार्गावर दरवर्षी लाखो रुपये खर्च वाया जातो आहे. वडगाव ते पाल या आपत्कालीन रस्त्याचा प्रश्न दहा वर्षापासून प्रलंबीत आहे. बसस्थानकासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र शासनाने अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. यात्रा कालावधीत सर्वाची जबाबदारी समजुन यात्रा पार पाडावी.

18 जानेवारीला भरणार खंडोबा यात्रा 
यंदाची खंडोबाची यात्रा पौष शुद्ध व्दादशी दिवशी शुक्रवारी 18 जानेवारी 2019 रोजी आहे. त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास मृग नक्षत्राच्या गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडेल. त्यानंतर 22 जानेवारी 2019 रोजी पाकाळणी आहेअशी माहिती देवराज पाटील यांनी यावेळी दिली. 

Web Title: meeting for paal yatra completed