सांगलीत साडेचार तासांच्या मेगाब्लॉकमध्ये गर्डरचे काम पुर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सांगली - विश्रामबागमधील रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे महत्वाकांक्षी काम आज पुर्ण करण्यात आले. सांगलीला कुपवाडशी जोडणाऱ्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेकडून मुख्य रुळावरील शेवटचे आज गर्डर टाकण्यात आले. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक थरारक कामगिरी बांधकाम विभागाने आज पार पाडली. नव्या वर्षात पुलावरुन सांगलीकरांना प्रवास करता येईल. 

उड्डाणपुलाचे काम सुमारे दोन वर्षांपासून सुरु आहे. आज त्यातील शेवटचा व महत्वाचा टप्पा पार पडला. पुलाच्या प्रत्यक्ष रुळांवरील भागात तीस मीटर लांबीचे लोखंडी गर्डर टाकण्यात आले. मोठमोठाल्या क्रेनच्या मदतीने गर्डर पुलाच्या बांधकामावर ठेवले गेले. यासाठी सार्वजनिक बांधकाम व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुरेशी तयारी केली होती. रेल्वेने साडेचार तासांचा मेगाब्लॉक घेतला होता.

सांगली ते मिरज स्थानकांदरम्यान या वेळेत एकही गाडी सोडण्यात आली नाही. दुपारी एक वाजता यशवंतपूर-जोधपूर एक्‍सप्रेस गेल्यानंतर दहा मिनिटांनी लगेच पुलाचे काम सुरु करण्याचे नियोजन होते; मात्र एक्‍सप्रेस दिड तास उशिरा आल्याने काम उशिरा सुरु करावे लागले. त्यानंतर मात्र गतीने गर्डर टाकण्यात आले. पुढील टप्प्यात सर्व्हिस रोडची कामे करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. 

असा आहे पूल 

0 काम सुरु झाले - 10 ऑगस्ट 2016 
0 मुदत होती - 9 ऑगस्ट 2018 
0 मुदतवाढ  - 31 मार्च 2019 पर्यंत 
0 पुलाची लांबी - 180 मीटर 
0 रुंदी - 10.50 मीटर 
0 मंजूर रक्कम - 15 कोटी 48 लाख 
0 आतापर्यंत खर्च - 11 कोटी 37 लाख रुपये 
0 उर्वरीत कामे - सेवा रस्ता, गटारी, फूटपाथ आदी 
 
अडथळा दूर होईल

या गेटवर दररोज वीसवेळा वाहतुक थांबवली जायची. मालवाहू गाड्यांची गणती वेगळीच आहे. शुक्रवारी 14, शनिवारी 15, बुधवारी 11, गुरुवार आणि रविवारी 12 रेल्वेगाड्या येथून जातात. नव्या पुलामुळे हा अडथळा दूर होईल. 

Web Title: Mega block in Sangli for Bridge work