कुटुंब कल्याण शस्रक्रियेबाबत पुरुष उदासिन

सुनील गर्जे  
बुधवार, 11 जुलै 2018

नेवासे : सर्वच कामांत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतांना कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात पुरुष उदासीनच दिसत दिसतात. यावर्षी (2017-18) मध्ये नगर जिल्ह्याला 24 हजार 719 इतके उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यात 18 हजार 600 जणांनी कुटुंब कल्याण शस्रक्रिया केल्याची नोंद आरोग्य विभागात असून त्यात शस्रक्रिया केलेल्या केवळ 39 पुरुषांचाच सामावेश असल्याचे दिसून आले आहे. यावरून या शस्रक्रियेबाबत पुरुष उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंब कल्याण शस्रक्रियामध्ये नगर जिल्हया राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर करणे, निरोधचा वापर करणे, दोन आपट्यावर शस्रक्रिया करणे, पुरुष नसबंदी शस्रक्रिया आदि विषयांवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रचार-प्रसार केल्या जात आहे. परंतु, सदर शस्रक्रियेकडे जिल्ह्यातील बहुसंख्य पुरुष पाठ दाखवीत असल्याने होत असलेला प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

जून 2018-19 अखेर पर्येंत कुटुंब कल्याण शस्रक्रियामध्ये जामखेड सर्वात आघाडीवर असून त्या खालोखाल पाथरडी, कर्जत, श्रीगोंदे, नगर, राहता व पारनेर आहे. तर रसवाट शेवट संगमनेर व राहुरी, नेवाशाची कामगिरी आहे.  

रोख बक्षीस व भरपाई
ही शस्रक्र्या करणार्‍या पुरुषाला केंद्र व राज्य शासन मिळून 1 हजार 451 रुपये मानधन स्वरुपात बक्षीस दिले जाते. तर शस्रक्रिया साथ दिवसांच्या आता अयशस्वी झाल्यास त्यावर 25 हजार खर्च केला जातो. तेही अयशस्वी झाल्यास शासनाकडून 30 हजार रुपये दिले जाते. 

जिल्ह्यात पाच वर्षात झालेल्या शस्रक्रिया
  वर्ष  -- वार्षिक उद्दीष्ट -- पुरुष शस्रक्रिया --  स्रि-शस्रक्रिया --एकूण  
•13-14   --  23914    --   58       --    22451  --   22509    
•14-15  -- 24719 --  53  -- 21447 --  21500  
•15-16  --  24719  --    39  -- 19977 -- 20016   
•16-17  --  24719 -- 53       --  18263 -- 18316  
•17-18  -- 24719  -- 39       --  18561 -- 18600   
•18-19 -- 24719 -- 39   --   8948  --  8961 

 "पुरुष नसबंदी शस्रक्रिया सोपी आहे. या शस्रक्रियेसाठी कुठलाही टाका किंवा चिरा मारावा लागत नाही. शस्रक्रिया केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या आरामाची गरज नाही व कोणतेही काम करण्यात अडचण नाही. या शस्रक्रियाला पाच-दहा मिनिटांचा वेळ लागत असल्याने पुरुषांनी पुढाकार घ्यावा. 
-डॉ. संदीप सांगळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर 

Web Title: men is not ok with family welfare operation