"माणसा असे गीत गावे तुझे हित व्हावे'

अमित आवारी
शनिवार, 7 डिसेंबर 2019

दादू साळवे यांना दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नसले तरी त्यांचा आवाज मात्र सुरेल आहे. नियतीने त्यांच्याकडून त्यांचा मुलगा व मुलगी हेरावून नेली. तीन नातवंडे, पत्नी व सुनेला घेऊन ते जीवन संघर्ष करीत आहेत. 1969 सालपासून ते आंबेडकरी जलशांत गीते सादर करत आहेत.

नगर ः "माणसा इथे मी तुझे गीत गावे; असे गीत गावे तुझे हीत व्हावे' अशी शाहीर वामन कर्डक यांची गीते पहाडी आवाजात शाहीर दादू साळवे सादर करीत आहेत. दृष्टीहीन असलेले शाहीर साळवे यांना आंबेडकरी जलशातील 2 हजार 200 गाणी मुखोद्‌गत आहेत. या गीतांच्या सहाय्याने सामाजिक व स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न ते गेल्या 50 वर्षांपासून करत आहेत. आंबेडकरी जलशातून शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीची मशाल तेवत ठेवण्याचे काम अजूनही करत आहेत.

दादू साळवे यांना दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नसले तरी त्यांचा आवाज मात्र सुरेल आहे. नियतीने त्यांच्याकडून त्यांचा मुलगा व मुलगी हेरावून नेली. तीन नातवंडे, पत्नी व सुनेला घेऊन ते जीवन संघर्ष करीत आहेत. 1969 सालपासून ते आंबेडकरी जलशांत गीते सादर करत आहेत.

"Men should sing such songs for you."

आंबेडकरी जलशांत त्यांनी शाहीर वामनदादा कर्डक यांच्या बरोबर अनेक दिवस काम केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या रक्‍तात भिनलेले आहेत. हे विचार ते स्वरातून व्यक्‍त करतात तरूण पिढीने समाज प्रबोधनासाठी आंबेडकरी जलशात यावे, असे त्यांना वाटते.

शासनाने आता त्यांना तुटपुंजे मानधन सुरू केले असले तरी हे पैसे त्यांच्या कुटूंबाचा खर्च भागविण्यास कमी पडत आहेत. जलशातून लोक त्यांना सढळ हाताने मदत करतात. हे पैसे व सून करत असलेल्या खासगी नोकरीतून कुटूंबाचा गाडा ओढला जात आहे. 

 भाषा का पता लगाएंअंग्रेज़ीमराठीहिन्दी मराठीअंग्रेज़ीहिन्दी  "माणसा असे गीत गावे तुझे हित व्हावे'    "Māṇasā asē gīta gāvē tujhē hita vhāvē' 39/5000 "Men should sing such songs for you."   सुझाव भेजें इतिहास सहेजा गया बिरादरी

दादू साळवे आपल्या गीतांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत आहेत. त्यासाठी त्यांना बोलावतील त्या कार्यक्रमाला ते जातात. शाहीर वामन कर्डकांची गीते हेच त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते. त्यांनी शाहीर आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांच्या बरोबरही जलशातून गीते सादर केलेली आहेत. 

आंबेडकर यांचे समाजावर ऋण 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक ऋण आपल्यावर आहे. त्यांनी केवळ एका समाजासाठी काम केलेले नाही तर संपूर्ण बहुजन समाजासाठी काम केलेले आहे. हे ऋण फेडण्याचे काम आपण करायचे आहे. 
- दादू साळवे,शाहीर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Men should sing such songs for you."