जात पडताळणी कार्यालयाचे मेसेज बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • जात पडताळणीच्या अर्जातील त्रुटींची माहिती मोबाईलद्वारे मिळेना
  • जात पडताळणी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे घरपोच मिळण्याची सेवा बंद
  • टपाल अन्‌ मोबाईल रिचार्जसाठी कार्यालयीन खर्च मागणी करूनही नाहीच
  • डिजिटल लॉकरला नाही विजेचे कनेक्‍शन : लाखो फायली कपाटातच बंद
  • अर्ज करून अडीच महिने झाल्यानंतरही मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र

सोलापूर : जात पडताळणी कार्यालयात वैधतेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जातील त्रुटींची माहिती संबंधितांना मोबाईलद्वारे मिळावी, प्रमाणपत्र पोस्टाद्वारे घरपोच मिळावे यासाठी कार्यालयीन खर्च दिला जात होता. मात्र, काही महिन्यांपासून तो मिळत नसल्याने लाभार्थींना पदरमोड करून पडताळणी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

हेही वाचा : एक रुपयाचा कढीपत्ता, "हे' झाले बेपत्ता

सर्वोच्च न्यायालयाने 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 पर्यंतची जात वैधता प्रमाणपत्रे अवैध ठरविली. त्यानंतर या काळातील फायली डिजिटल लॉकरमधून काढण्याची लगबग सुरू आहे. मात्र, सोलापूरसह काही जिल्ह्यांतील पडताळणी समिती कार्यालयांतील लॉकरला विजेचे कनेक्‍शन नसल्याने अद्याप फायली लॉकरमध्येच अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विजेचे कनेक्‍शन देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण कर्मचारी सांगू लागले आहेत. तत्पूर्वी, न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधितांनी एका वर्षाच्या मुदतीत नव्याने अर्ज करणे आवश्‍यक आहे. मात्र, लॉकरमधील फायली काढण्यासाठी विलंब लागत असल्याने अर्ज कसा करायचा, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे उच्च शिक्षण घेताना शासकीय सवलतीचा लाभ मिळेल, या उद्देशाने अनेक विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडे अर्ज केले. मात्र, अडीच महिन्यांचा काळ लोटला तरीही त्यांच्या अर्जाचा ठावठिकाणाच समजेना, अशी स्थिती सोलापूर कार्यालयात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सोलापूर केंद्रातून "चकोट घास' प्रथम

ठळक बाबी...

  • जात पडताळणीच्या अर्जातील त्रुटींची माहिती मोबाईलद्वारे मिळेना
  • जात पडताळणी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे घरपोच मिळण्याची सेवा बंद
  • टपाल अन्‌ मोबाईल रिचार्जसाठी कार्यालयीन खर्च मागणी करूनही नाहीच
  • डिजिटल लॉकरला नाही विजेचे कनेक्‍शन : लाखो फायली कपाटातच बंद
  • अर्ज करून अडीच महिने झाल्यानंतरही मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र

हेही वाचा : मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया

कामाचा खूप ताण आहे
जात पडताळणीसाठी अर्ज केलेल्यांना मेसेज जातात की नाही, याची माहिती नाही. माझ्याकडे दोन जिल्ह्यांचा चार्ज असल्याने कामाचा खूप ताण आहे. कार्यालयाची स्थिती काय आहे, याची माहिती कर्मचाऱ्यांनाच आहे.
- ज्ञानदेव सूळ, अध्यक्ष,
जात पडताळणी समिती, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Message from caste verification office closed