VIDEO : काहींनी लावले दिवे काहींनी तोडले अकलेचे तारे... हुल्लडबाज आले रस्त्यावर

A message of solidarity lit the lights
A message of solidarity lit the lights

नगर ः "गो कोरोना गो' अशा घोषणा देत नागरिकांनी रात्री 9 वाजता घरातील दिवे बंद करत अंग, गॅलरी, रस्ते, घराच्या छतांवर दिवे लावले. यावेळी काही नागरिक रस्त्यावर येऊन मोबाईल बॅटरीचा प्रकाश झोतही टाकला. काही उत्साही मंडळींनी जोरदार आतषबाजी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकटाऊन काळात आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून अंगणात तेलाचे दिवे, मेणबत्त्या, बॅटरी घरातील अंगण, गॅलरी अथवा छतावर लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज रात्री नऊ वाजताच नागरिकांनी घरातील दिवे बंद केले. घराच्या बाहेर अंगणात, गॅलरी अथवा घरांच्या छतावर दिवे व मेणबत्त्या लावल्या. ही नागरिकांनी रस्त्यावर येत समुहाने मोबाईल बॅटरी सुरू केल्या.

माळीवाडा, नालेगाव आदी भागांत लहान मुले रस्त्यावर येऊन कुटूंबियांसह "गो कोरोना गो' अशा घोषणा देत होते. या काळात सोशल डिस्टन्सचे मात्र अनेकांना भान उरले नाही. काही उत्साही मंडळी रस्त्यांवर येऊन मोबाईल बॅटरीचा प्रकाश आकाशाच्या दिशेने करत समुहाने उभे होते.

या नागरिकांना समजावून सांगण्यात पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. महापालिका प्रशासनानेही शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांत दिवे व मेणबत्त्या लावल्या होत्या. घरात सर्वांनी दिवे मालविले असताना शहरातील पथदिव्यांचे प्रकाश झोत मात्र पडत होते. 

ग्रामीण भागातही दिवे लावले गेले. यात बच्चेकंपनीसह बुजुर्ग मंडळीही आघाडीवर होती. बऱ्याच ठिकाणी शटडाऊनमुळे वीज नव्हती. त्यामुळे त्यांना वीजप्रवाह बंद करण्याची गरज पडली नाही.

नवकार मंत्र

नगर शहरातील इमारत कंपनी या मध्यवस्तीत महिलांनी नऊ वाजता दिवे लावले. तसेच त्यासोबत नवकार मंत्राचे पठणही केले. काही ठिकाणी ओंकार मंत्राचा जप करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com