‘म्हैसाळ’ची पंप दुरुस्ती हवी - घोरपडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कवठेमहांकाळ - म्हैसाळ उपसा योजनेचा कारभार अनियंत्रित आहे. या योजनेच्या यंत्रणेची वाताहत झाली आहे. ती अशीच सुरू राहिली, तर शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होईल. आजपर्यंत पाणी योजनेवर कोट्यवधीचा खर्च झाला. तरीही कारभार नियोजनशून्य आहे.

विद्युतपंपाच्या दुरुस्तीअभावी योजना बंद पडेल, अशी भीती माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, पंपदुरुस्ती तत्काळ न झाल्यास शेतकरी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘म्हैसाळ योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. योजनाच धोक्‍यात आली आहे. शेतकरी अडचणीत आहे. १५ वर्षांपासून पंप हाऊसमध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नसल्याने बहुतेक पंप पडण्याच्या स्थितीत आहेत. पाण्याचा उपसा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्याचा परिणाम म्हणून योजनेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे योजनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.’’

ते म्हणाले, ‘‘कडक उन्हामुळे नगदी पैसे मिळवून देणारी पिके धोक्‍यात आली आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे पूर्ण दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करीत असेल, कोणी अन्याय करीत असेल तर पुढील काळात रस्त्यावर उतरायलासुद्धा मागेपुढे पाहणार नाही. द्राक्षसारख्या पिकांत शेतकऱ्यांनी जी गुंतवणूक केली ती वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायला कोणीच तयार नाही हे दुदैव आहे.’’ 

बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले, महादेव माळी, विठ्ठल पवार, ईश्वर पवार, अरुण भोसले, वैभव नरूटे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विनाकारण भुर्दंड
श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘पंधरा वर्षांपूर्वी बसवलेले पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. बहुतांश वीज वाया जात आहे. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. जर मोटारी दुरुस्त केल्या, पाण्याचे योग्य नियोजन केल्यास दरवर्षी चार हजार कोटींचे उत्पादन मिळेल. अनियांत्रित कारभार आणि सत्तेचा गैरवापरामुळे ‘म्हैसाळ’ योजनेची वाताहत होत आहे. योजनेबाबत शासनाकडून तत्काळ निर्णय न झाल्यास न्यायालयात जाऊ.’’

Web Title: mhaisal pump repairing