म्हैसाळ, टेंभूचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मिरज - दुष्काळी तालुक्‍यांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी "म्हैसाळ'चे पाणी विविध तलावांत सोडा, असा आदेश देण्यात आला आहे. 

मिरज - दुष्काळी तालुक्‍यांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी "म्हैसाळ'चे पाणी विविध तलावांत सोडा, असा आदेश देण्यात आला आहे. 

जत, मिरज, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव व आटपाडी या तालुक्‍यांना येत्या तीन महिन्यांसाठी "टेंभू' व "म्हैसाळ'मधून पाणी सोडावे, असे आदेशात म्हटले आहे. यंदा मार्चपासून टंचाईची तीव्रता वाढल्याने "म्हैसाळ' सुरू करण्याची कार्यवाही शासनाने केली. कालव्यात पाणी पडले तरी पिण्यासाठी सोडले नव्हते. गावोगावचे तलाव, काही ओढे-नाले यातून पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याची गरज भागणार होती. जिल्हा प्रशासनाने या तालुक्‍यांतून टंचाईग्रस्त गावांची माहिती मागवली. जिल्हा परिषदेने तशी यादी 28 व 31 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. त्याची दखल घेत त्या गावांना पाणी सोडण्याचे आदेश काल (ता. 5) पाटबंधारेच्या अधीक्षक अभियंत्यांना मिळाले. 

मिरज तालुक्‍यात "म्हैसाळ'चे पाणी सोडण्यात येईल. खंडेराजुरी, एरंडोली, चाबुकस्वारवाडी, शिपूर, कळंबी, मालगाव, सलगरे, बेळंकी, सिद्धेवाडी, खटाव, लक्ष्मीवाडी, डोंगरवाडी, मल्लेवाडी, पायाप्पाचीवाडी, बेडग, आरग, लिंगनूर, जानराववाडी, गुंडेवाडी, सोनी, भोसे, करोली (एम) गावांचे पाझर तलाव भरून घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. जत तालुक्‍यात बसाप्पाचीवाडी, प्रतापपूर, वाळेखिंडी, कोसारी, बेळुंखी, बिरनाळ, कंठी, तिप्पेहळ्ळी, शेगाव, कुंभारी, कुडनूर, शिंगणापूर, अंकली, डोर्ली, हिवरे, वाळेखिंडी, कासलिंगवाडी, बागेवाडी येथील पाझर तलाव, मध्यम प्रकल्प व ओढापात्रात पाणी सोडण्यात येईल. 

दुष्काळी पूर्व भागात टंचाईने गंभीर स्वरूप धारण करण्यात आले आहे. हॉटेलसह व्यवसाय पाण्याअभावी बंद ठेवावे लागले. "म्हैसाळ'च्या पाण्याशिवाय पर्याय नाही. आता कालव्यातून पाणी सोडल्यानंतर दिलासा मिळणार आहे. 

Web Title: Mhaisal tenbhu the order to leave drinking water