म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयात अडकले 

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

1983 च्या दरम्यान या भागातील दुष्काळी गावाच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेचा मुळ आराखडा तयार झाला. 1993 मध्ये या योजनेस मंजुरी दिली. आज मितीस दोन हजार पेक्षा अधिक कोटी खर्चुनही मंगळवेढयास पाणी नाही. मध्यतरीच्या काळात या योजनेस निधी न मिळाल्याने या योजनेचे काम थांबले होते. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राम साळे, भारत भालके यांनी या योजनेस निधी मिळावा म्हणुन प्रयत्न केले. विदयमान सरकारने पंतप्रधान सिंचन योजनेतून मोठया प्रमाणात निधी उपलब्थ केल्यामुळे तालुक्याच्या सिमावर्ती भागात या योजनेचे पाणी येण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. 

यंदाच्या दुष्काळात तालुक्यातील अर्धवट असलेल्या कामांमुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्याचे मान्य केले होते. तशा सुचना जलसंपदामंत्र्यानी कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्याला दिल्या. जलसंपदा मंत्री सत्ताधारी भाजपा, कृष्णा खोरे महामंडळ ही भाजपाच्या ताब्यात अशा परिस्थितीत तलावात पाणी सोडले की याचे श्रेय स्थानिक आमदाराच्या पाठपुराव्याला की गोडसेच्या आंदोलनाला द्यायचे, यापेक्षा मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करणाय्रा केंद्रातील भाजपा सरकारला यात  प्रशासनाने या मात्र या भागातील जनतेला पाणी सोडण्याचे आश्‍वासन देवूनही पाणी न सोडता जनतेला वेठीस धरण्याचे काम केल्यामुळे या भागातील जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.जलसंपदा विभागाचे अधिकाय्रानी शिवसेना-भाजपाच्या जलसंपदामंत्र्याला चुकीची महिती देत दिशाभूल करू लागले.पण अधिकाय्रानी आताच मुळ आराखडयात तलावात पाणी सोडण्याची तरतुद नसल्याचे सांगू लागले आणि कालव्याची कामे लवकरच पुर्ण करुनच तालुक्यातील पात्र क्षेत्राला पाणी देण्याबाबत आंदोलक जि.प.सदस्या शैला गोडसेच्या आंदोलनापुर्वीच सांगायला हवे होते. दुष्काळामध्ये शेती संकटात असून जनावराचे चाय्रासाठी मोठया प्रमाणात हाल सुरु आहे. अशी परिसरात प्रशासनाची पाण्याबाबतची टोलवाटोलवी आणि पळवाट मात्र जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.

श्रेयापेक्षा जनतेची आणि जनावराची दाहकता महत्वाची असून अपूर्ण कामाचे व तलावात पाणी सोडण्याची तरतूद नसल्याचे कारण जलसंपदा मंत्राला प्रशासनाने सांगायला हवे होते. पाण्याच्या आशेवर असलेल्या या भागातील जनतेच्या सहनशीलताचा अंत पाहू नये.
- नितीन पाटील पक्षनेते

Web Title: Mhasal's water stuck in political order