माणमध्ये गहू जोमात; ज्वारी कोमात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

म्हसवड - हवामानातील बदलामुळे माण तालुक्‍यातील गव्हाचे पीक जोमात, तर ज्वारीचे पीक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात ‘कही खुशी तो कही गम’ अशी मनस्थिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

म्हसवड - हवामानातील बदलामुळे माण तालुक्‍यातील गव्हाचे पीक जोमात, तर ज्वारीचे पीक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात ‘कही खुशी तो कही गम’ अशी मनस्थिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

माण तालुका रब्बी हंगामातील गावरान चविष्ठ ज्वारी उत्पादनास सर्वपरिचित आहे. गावोगावच्या शेतशिवारात यंदा ज्वारीचे पीक जोमदार आले; परंतु अचानकपणे हवामानात बदल होऊन थंडीची लाट आली. त्यामुळे ज्वारीवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव जलद गतीने जाणवू लागला व शिवारात हिरवीगार डोलणारे ज्वारीचे पीक काळपट झाली आहे. आता जनावरास खान्यायोग्यही ज्वारीची ताटे राहिली नाहीत. परिणामी ज्वारीच्या कडब्याची प्रत खराब झाली व पोग्यातून बाहेर आलेल्या कणसामधील टपोरे दाणे भरण्याची प्रकिया सुरू असतानाच थंडीच्या लाटेने समाधानकारक दाणे भरू शकले नाहीत. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनातही मोठी घट येणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतीत मनस्थितीत आहे

ज्वारीच्या नेमकी उलट स्थिती गव्हाच्या पिकाची आहे. पडू लागलेली थंडी रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकास पोषक ठरू लागली आहे. परिणामी  
गावोगावच्या शिवारात गव्हाची वाढ जोमात होऊन गहू पीक हिरवेगार पडले आहे. सध्या गव्हाची लोंबी हुरड्यात आलेली आहे. हरभरा पिकासही थंड हवामानाचा फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे गहू व हरभरा पीक उत्पादनात भरीव वाढ अपेक्षित आहे.

Web Title: mhaswad news satara news wheat jowar agriculture