शेखर गोरेंवर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

म्हसवड - सौरऊर्जा कंपनीकडे खंडणी मागून पवनचक्की उभारणीच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शेखर गोरे आणि म्हसवडचे नगरसेवक संग्राम शेटे, विलास पाटोळे यांच्यावर आज म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नगरसेवक शेटे आणि पाटोळे हे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

म्हसवड पोलिसांनी सांगितले, की वरकुटे मलवडी व शिरताव (ता. माण) येथे गिरिराज रिन्युएबल प्रा. लि. या सौरऊर्जा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. संग्राम शेटे, विलास पाटोळे व 10 ते 15 जणांनी तेथे जाऊन कंपनीच्या कामगारांना हुसकावून लावले. इन्व्हर्टर रूम, रस्ते आदींचे जेसीबीने नुकसान केले. "शेखर गोरे यांना न विचारताच तुम्ही कामे कशी काय सुरू केली? हप्त्यापोटी ठरलेली रक्कम दिल्याशिवाय शेखर गोरे काम करू देणार नाहीत. काम सुरू केल्यास हात-पाय मोडू,' अशी धमकी देऊन त्यांनी अंदाजे चार लाखांचे नुकसान केल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक विशाल दिलीप पट्टेबहाद्दूर (वय 27) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर शेखर गोरे, नगरसेवक संग्राम शेटे, विलास पाटोळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: mhaswad news tribute case on shekhar gore