ग्रामीण महिलांना उद्योगासाठी मायक्रो फायनान्सचा आधार

हुकूम मुलाणी
बुधवार, 30 मे 2018

मंगळवेढा - ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जासाठी होणारे हेलपाटे, पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे प्रस्थ वाढले असून, राष्ट्रीयकृत बँक,पतसंस्था पेक्षा मायक्रो फायनान्सचा आधार तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना वाटू लागला. यात आठ हजार पेक्षा अधिक महिलांनी यातील कर्जाचा लाभ घेतला आहे. 

मंगळवेढा - ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जासाठी होणारे हेलपाटे, पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे प्रस्थ वाढले असून, राष्ट्रीयकृत बँक,पतसंस्था पेक्षा मायक्रो फायनान्सचा आधार तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना वाटू लागला. यात आठ हजार पेक्षा अधिक महिलांनी यातील कर्जाचा लाभ घेतला आहे. 

नदीकाठच्या भागात शेतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला असला तरी अन्य ठिकाणी दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. या ठिकाणी रोजगाराचा अभाव आहे. त्यामुळे नदीकाठापेक्षा अन्य ठिकाणी वास्तव्य करणारी लोकसंख्या मोठी आहे. या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी शेळी पालन, गाई पालन, किराणा, कापड दुकानासह अन्य छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थीक मदतीची आवश्यकता आहे. सध्या राष्ट्रीयकृत बँकेत रिक्त पदामुळे होणारा कामावरील ताण वाढला असून, कर्जमाफी व अन्य माहिती वरिष्ठ कार्यालयाला देताना नाकीनऊ आले आहेत. कर्मचारी भेटवयास आलेल्या कर्जदारास सध्या वाटपाचे उदिष्ठ संपले आहे. बँकेचे ऑडीट चालू आहे व परतफेड कशी करणार अन्य कारणे सांगून परत पाठविले जात आहे. तर उदिष्ठपुर्तीसाठी जवळच्या खातेदारांना कर्ज उपलब्ध करुन दिल्याने नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्याला बँकेपासून चार हात दुर ठेवले जाते. तर पतसंस्थेकडील व्याजदार सोळा टक्यापेक्षा अधिक असल्याने हे कर्ज परवडत नाही. यामुळे ग्रामीण भागातील मायक्रोफायनान्स आधार घेतला आहे.

यामुळे 10 महिलाचे प्रत्येक गावात पाच ते दहा गट तयार केले असून, घेतलेल्या कर्जाचा हफ्ता प्रत्येक आठवडयात जमा करावयाचा आहे. व्याजाचा दर कमी असल्याने आठवडाभर काम करुन त्यातून या कर्जाची परतफेड होवू शकत असल्याने तालुक्यातील आठ हजारापेक्षा अधिक महिला या सहभागी होवून आधारकार्ड रेशनकार्ड व दोन फोटो दिले की तात्काळ वशिलेबाजी न करता कर्जदार झाल्या.  कर्जाची परतफेड निश्‍चीत केलेल्या आठवडयातील निम्मे आठवडे हप्ते भरले की पुन्हा नवीन कर्ज विनासायास विना कागदपत्रे व जामीनदार, ना अ‍ॅडव्हान्स चेक, पध्दतीने उपलब्ध होत असल्याने बँका पतसंस्थेपेक्षा मायक्रो फायनान्स त्यांना आधारवड वाटू लागला. 

हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात महाराष्ट्रातील व कर्नाटकातील फायनान्स कंपन्यानी सहभाग घेतला असून, त्यांचे प्रतिनिधी गावोगावी नवीन कर्जदार मिळावे म्हणून शोधाशोध करताना दिसत आहे. 

बँकेच्या कर्जासाठी हेलपाटे व पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे फायनान्स मधून कर्ज घेवून रखडलेले घराचे काम पुर्ण केले. आठवडाभर मजुरी करुन याचे हप्ते नियमित भरत आहे. सुनिता ऐवळे 

या आहेत तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका
बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा, मरवडे, लक्ष्मी दहीवडी, भोसे, भारतीय स्टेटस बँक शाखा मंगळवेढा, सिध्दापूर, बँक ऑफ महाराष्ट्र नंदेश्वर मंगळवेढा, ब्रम्हपुरी, यासह अन्य बँका तालुक्यात कार्यरत आहेत.

Web Title: Micro finance support for rural women for the industry